Home ताज्या घडामोडी Diwali News: चित्रगुप्त पूजेला लेखणीची पूजा का केली जाते? जाणून घ्या

Diwali News: चित्रगुप्त पूजेला लेखणीची पूजा का केली जाते? जाणून घ्या

0
Diwali News: चित्रगुप्त पूजेला लेखणीची पूजा का केली जाते? जाणून घ्या
AI Image

Diwali News: दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर, रोषणाई, दिवे, फटाके, फराळ, नवीन कपडे परिधान करणे याशिवाय दिवाळीतील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे. तसेच दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे पौराणिक काळापासून प्रथा, त्यामागे कथा आहे. त्यातीलच एक म्हणजे चित्रगुप्त पूजा. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच भाऊबीजला, भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते. या दिवशी लेखणी आणि शाईच्या कुपीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहित आहे का चित्रगुप्त पूजेच्या वेळी लेखणीची पूजा का केली जाते? यामागील धार्मिक श्रद्धा… याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

असं म्हणतात, चित्रगुप्त महाराज मानवी कर्मांचा हिशोब ठेवतात. त्यामुळे या दिवशी लेखणीची पूजा केली जाते. चित्रगुप्त पूजा दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. 2025 मध्ये चित्रगुप्त पूजा 23 ऑक्टोबर रोजी पार पडली. चित्रगुप्त पूजेच्या दिवशी वह्यांची पूजा केली जाते. लेखण्या, शाईची भांडी आणि इतर वस्तूंचीही या दिवशी पूजा केली जाते. चित्रगुप्त पूजेच्या दिवशी स्नान करून ध्यान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि पूजास्थळ स्वच्छ करावे. त्यानंतर, धूप आणि दिवे लावून पूजा सुरू करावी त्यानंतर चित्रगुप्ताला फुले अर्पण करावीत. चित्रगुप्त महाराजांना खीर, मिठाई आणि इतर गोड पदार्थ यांचा नैवेद्य अर्पण करता येतात. तसेच, चित्रगुप्त महाराजांना लेखण्या, पुस्तके, अत्तर आणि इतर वस्तू अर्पण कराव्यात. या दिवशी चित्रगुप्तजींच्या मंत्रांचा जप करावा आणि शेवटी आरती करावी.

https://www.prahaar.in/2026/11/07/maharashtra-political-news-chief-minister-devendra-fadnavis-to-celebrate-this-years-diwali-on-the-farmers-land-statement-by-navnath-ban/

चित्रगुप्त पूजेदरम्यान कोणत्या मंत्रांचा जप करावा?

ध्यान मंत्र- मासिभजनसंयुक्तम् ध्यायेत्तम च महाबलम्। लेखिनीपट्टीकहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम् ।

लोकप्रिय मंत्र- ओम श्री चित्रगुप्ताय नमः

असं म्हंटल जात की, एकेकाळी सौदास नावाचा एक निर्दयी आणि अत्यंत क्रूर राजा होता. त्याच्या क्रूर वागण्यामुळे त्याची प्रजा संतप्त झाली होती. तो त्यांच्यावर अनेकदा अत्याचारही करायचा. एकदा असेच आपल्या राज्यात फिरत असताना सौदासला एक ब्राह्मण तल्लीन होऊन पूजा करताना दिसला. उत्सुकतेपोटी राजाने त्या ब्राह्मणाला विचारले, “तुम्ही कोणत्या देवतेची आणि का पूजा करत आहात?” यावर ब्राह्मणाने उत्तर दिले, “आज कार्तिक शुक्ल द्वितीया आहे, म्हणून मी यमराजाचे हिशेबनीस असलेल्या चित्रगुप्त महाराजांची पूजा करत आहे. चित्रगुप्ताची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व पापे नाहीशी होतात.” ब्राह्मणाच्या शब्दांनी प्रभावित होऊन राजानेही चित्रगुप्त आणि यमराजांची पूजा केली. राजाच्या मृत्यूनंतर, चित्रगुप्ताने त्याच्या कर्मांची नोंद तपासली. तेव्हा चित्रगुप्ताने यमराजांना सांगितले की, जरी राजाने आयुष्यभर पापे केली असली तरी, त्याने आपल्या अंतिम क्षणांपूर्वी यमराज आणि चित्रगुप्त या दोघांचीही भक्तिभावाने पूजा केली आहे, त्यामुळे त्याला नरकात पाठवता येणार नाही. त्याच्या भक्तीमुळे राजाला मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती झाली. त्यामुळे आजही धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आणि चित्रगुप्ताची पूजा करणाऱ्या व्यक्तीला जीवनात सुख-शांती आणि मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते.

तसेच असेही मानले जाते की चित्रगुप्त महाराज कार्तिक शुक्ल द्वितीयेला प्रकट झाले आणि म्हणूनच आजही या दिवशी चित्रगुप्त यांची पूजा केली जाते. चित्रगुप्त हे भगवान ब्रह्मदेवाच्या मनातून प्रकट झालेले आहेत. चित्रगुप्त पूजेच्या दिवशी वही, लेखणी आणि शाईची कुपी यांची पूजा करणे शुभ मानले जाते. चित्रगुप्त महाराजांची पूजा केल्याने शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत शुभ फळ मिळते.

Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार डॉट इन त्याचे समर्थन करत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here