Home एक्सक्ल्युजिव्ह IND vs NZ, 2nd ODI: भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी नमवलं, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी

IND vs NZ, 2nd ODI: भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी नमवलं, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी

0
IND vs NZ, 2nd ODI: भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी नमवलं, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी
IND vs NZ, 2nd ODI: भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी नमवलं, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी (Photo: BCCI Twitter)

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभवाची धूळ चारली. तसेच पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून 2-0 ने आघाडी घेतली. दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी पाऊस पडल्याने हा सामना 47 षटकांचा करण्यात आला. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. भारताने न्यूझीलंडला 134 धावांवर रोखलं. त्यामुळे विजयासाठी फक्त 135 धावांचं आव्हान मिळालं. पण हे आव्हान गाठताना भारतीय संघाची दमछाक झाली. एक एक धाव करताना विकेट सांभाळणं महत्त्वाचं झालं होतं. त्यात आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने मधल्या फळीच्या फलंदाजांवर दबाव आला होता. पण भारतीय संघाने बाजी मारली. भारताने 26 षटकात 7 गडी गमवून 113 धावा केल्या होत्या. पण पावसाने हजेरी लावली आणि खेळ थांबवण्यात आला. भारत त्याक्षणी 4 धावांनी पुढे होते. पाऊस काही थांबला नाही, त्यामुळे भारताने हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 4 धावांनी जिंकला.

भारताचा डाव

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. कर्णधार शुभमन गिलला खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूचा सामना करताना विकेट दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही काही खास करू शकला नाही. विराट कोहली 7 धावा करून बाद झाला. मागच्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्माने या सामन्यात सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 28 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत 23 धावांची खेळी केली. अक्षर पटेलही फार काळ तग धरू शकला नाही. त्याचा खेळही 7 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांची जोडी जमली. या जोडीने 43 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. पण श्रेयस अय्यर 30 धावा करून बाद झाला आणि पुन्हा दडपण वाढलं. नमन धीर 12, तर अंशुल कंबोज 1 धाव करून तंबूत परतला.  सुदैवाने भारतीय संघ 4 धावांनी पुढे होता. अन्यथा हा सामना हातून गेला असता.

https://www.prahaar.in/2026/11/07/virat-kohli-angered-by-fans-actions-during-the-second-odi-against-new-zealand-watch-video/

न्यूझीलंडचा डाव

नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. खरं तर हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. कारण न्यूझीलंडला सुरूवातीला धक्के बसले. अवघ्या 53 धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत होता. विल यंग 6, टिम सैफर्ट 0, हेनरी निकोल्स 11, टॉम लॅथम 7, ग्लेन फिलिप्स 0 असे बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती नाजूक झाली. पण सहाव्या विकेटसाठी डॅरेल मिचेल आणि मिचेल सँटनर यांनी 90 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे न्यूझीलंडचा डाव काही अंशी सावरला. यात डॅरेल मिचेलल एक जीवदान मिळालं. त्याने 104 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर मिचेल सँटनर 31 धावा करून बाद झाला. यानंतर नाथन स्मिथ 3, कायल जेमिसन 7 आणि ब्लेयर टिकनर 2 धावा करून तंबूत गेले. भारताकडून गुरनूर ब्रारने सर्वाधिक 4 विकेट काढल्या. तर आकिब नबी 2, अंशुल कंबोज 2 आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here