नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये एका मागून एक अनेक बड्या कलाकारांना बिष्णोई गँगने धमक्या दिल्या आहेत. यातील एक म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या टीमला कुख्यात गुंड हॅरी गँगस्टरने धमकावल्याचा आरोप होता. याचा लॉरेन्स बिश्नोई गँंगशी संबंध होता. त्याला आता अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे. हॅरीने रणवीर सिंह कडे 20 कोटी मागितल्याचा आरोप आहे. हॅरी बॉक्सर हा लॉरेन्स बिश्नोई गँंगमध्ये सक्रीय आहे. रोहित शेट्टीच्या टीमला मिळालेल्या धमकी प्रकरणात पोलिसांच्या हाती नवे पुरावे लागले असून हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या सेलनं हॅरी बॉक्सरबाबत माहिती दिली होती. त्यांनतर अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमा शुल्क अंमलबजावणी यंत्रणेकडून कॅलिफोर्नियात हॅरी बॉक्सरला ताब्यात घेण्यात आलं.
https://www.prahaar.in/2026/11/07/father-gifts-a-luxury-car-to-his-son-for-achieving-good-marks-in-the-ninth-grade-you-will-be-stunned-to-hear-the-price/
आता इतर अभिनेत्यांना आलेल्या धमक्या व टायगर श्रॉफवर झालेला हल्ला याचा तपासात काही उलगडा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हॅरी बॉक्सर च मूळ नाव आहे हरिचंद जाट आहे. लॉरन्स बिश्नोईच्या गँंग मधील तो प्रमुख गँंगस्टर आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीला धमकी दिल्यापासून तो अधिक चर्चेत आला होता. हॅरी बॉक्सर विरुद्ध राजस्थान, पंजाब, दिल्लीमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेत. कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार कारण्यामागेही हॅरी बॉक्सरच होता.
हॅरी बॉक्सरने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांना सोशल मिडिया पोस्टमधून त्याने धमकी दिली होती, याशिवाय ऑडिओ क्लिप जारी केल्या होत्या.