Home क्रीडा IND vs NZ: दुसऱ्या वनडेत शुभमन गिल फ्लॉप; 71 डावांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली अशी घटना!

IND vs NZ: दुसऱ्या वनडेत शुभमन गिल फ्लॉप; 71 डावांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली अशी घटना!

0
IND vs NZ: दुसऱ्या वनडेत शुभमन गिल फ्लॉप; 71 डावांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली अशी घटना!
दुसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिल फेल गेला. या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी 135 धावा दिल्या होत्या. त्यामुळे सोपं आव्हान असं वाटलं. पण भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने हे आव्हान कठीण वाटलं. कर्णधार शुभमन गिल वेलिंगट वनडे सामन्यातही फेल गेला. (Photo: ANI)
शुभमन गिलने क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच असा दिवस पाहिला. यापूर्वी शुभमन गिलसोबत असं कधीच घडलं नव्हतं. शुभमन गिलने 2019मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत 72 वनडे सामने खेळले आहे. यात 71 डावात आतापर्यंत दोनदा शून्यावर बाद झाला. (Photo: ANI)
शुभमन गिल दोन वेळा शून्यावर बाद झाला, त्यापैकी एक वेलिंगटन वनडे सामना आहे. या सामन्यात शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जेकब डफीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्याच चेंडूवर बाद होणं म्हणजेच गोल्डन डक… शुभमन गिल पहिल्यांदाच गोल्डन डकवर बाद झाला. (Photo: ANI)
शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्मासोबतची त्याची सलामीची भागीदारी फक्त चार धावांची राहिली. मागच्या सामन्यात गिलने 37 धावा केल्या होत्या. (Photo: ANI)
शुभमन गिलने 72 सामन्यांच्या 71 डावांमध्ये 63.55 च्या सरासरीने 3750 धावा केल्या आहेत. यात 11 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 223 नाबाद आहे. (Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here