Home ब्रेकिंग न्यूज Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

0
Vikhroli Railway Station : विक्रोळी स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर तरुणाची उडी; प्रवाशाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

Mumbai News: मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलसमोर उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला त्याच्या मित्राने वेळीच बाजूला खेचून वाचवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मित्राने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/07/second-odi-against-new-zealand-shubman-gill-dropped-an-easy-catch-of-daryl-mitchell-he-has-been-fortunate-so-far-in-2023/

मित्राने धावत्या लोकलसमोरून खेचले बाजूला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण विक्रोळी स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर धावत्या लोकलसमोर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्यासोबत असलेल्या मित्राने क्षणाचाही विलंब न करता त्याला बाजूला खेचले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

मात्र, मित्राने बाजूला खेचल्यानंतरही संबंधित तरुण पुन्हा रेल्वे रुळांकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मित्राने त्याला घट्ट पकडून ठेवत पुन्हा असा प्रयत्न करण्यापासून रोखले. या संपूर्ण प्रसंगात मित्राने दाखवलेल्या धैर्यामुळे तरुणाचा जीव वाचला.

सोशल मीडियावर तरुणाचे कौतुक

या घटनेचा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, संबंधित तरुणाने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे पोलिसांकडून घटनेची दखल घेऊन पुढील माहिती घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here