Rise and Fall Season 2 winner: ‘एमएक्स ओरिजिनल राइज अँड फॉल सीझन 2’ चा विजेता शहजाद पूनावाला ठरला आहे. 6 आठवड्यांच्या स्पर्धेनंतर ‘राईज अँड फॉल सीझन 2’ या शो चा समारोप झाला असून शहजाद पूनावालाने ट्रॉफी जिंकली आहे. पूनावालाने शेवटच्या फेरीत प्रियांका चहर चौधरी आणि गौतम गुलाटी यांचा पराभव केला असून ट्रॉफी आणि 35 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली आहे. महाअंतिम सोहळ्याची सुरुवात सहा अंतिम स्पर्धकांनी त्यांच्या नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करून केली. या कार्यक्रमासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी या शो चे अतिशय उत्तमरीत्या सूत्रसंचालन केले. तब्बल 15 सेलिब्रिटी स्पर्धकांना मागे टाकत शहजाद यांनी केवळ ‘राईज अँड फॉल २’ ची चमचमती ट्रॉफीच जिंकली नाही, तर 35 लाख रुपयांचं रोख धनादेशही पटकावला आहे. या शोमध्ये टीव्हीची लोकप्रिय नागीण फेम अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी फर्स्ट रनर-अप आणि गौतम गुलाटी सेकंड रनर-अप ठरले.
https://www.prahaar.in/2026/11/06/relief-for-farmers-and-livestock-owners-in-304-drought-affected-talukas-silt-deposited-areas-within-water-reservoirs-will-be-available-on-lease-for-fodder-cultivation/
या शोचा महाअंतिम सोहळा 6 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसारित झाला. ‘तिकिट टू फिनाले’ चॅलेंज जिंकून शहजाद या सीझनचा पहिला अंतिम स्पर्धक बनला होता. सहा अंतिम स्पर्धकांमध्ये शहजाद पूनावाला, गौतम गुलाटी, प्रियांका चहर चौधरी, स्वरा भास्कर, करण पटेल आणि निहारिका तिवारी यांचा समावेश होता. तर टॉप ५ च्या लिस्ट मध्ये सूत्रसंचालक वीरेंद्र सेहवागने यांनी सहा स्पर्धकांसाठी काही ‘भेटवस्तू’ आणल्या होत्या. त्यातून 5 स्पर्धक निश्चित करण्यात आले. निहारिका तिवारी या स्पर्धेतून ६व्या स्थानी बाहेर निघाली. त्यानंतर हर्ष गुजरालने आपल्या विनोदी विनोदाने वातावरण हलके केले. त्यांनतर करण व स्वरा भास्कर शो मधून बाहेर निघाले आणि शो ला टॉप ३ कॉन्टेस्टन्ट मिळाले त्यात गौतम, प्रियांका आणि शेहजाद यांचा समावेश होता.
शो जिंकल्यावर, शहजाद पूनावाला यांनी अशी कृती केली ज्याने सर्वत्र शेहजाद यांचं कौतुक होत आहे. “शोमध्ये येण्यापूर्वी मी वचन दिले होते की, मला मिळालेली सर्व रक्कम बिहार आणि आसाममधील दुर्घटनेसाठी मुख्यमंत्री निधीला दान करेन.” असे शेहजाद यांनी राईज अँड फॉल’ मध्ये प्रवेश करताना सांगितले होते. त्यामुळे ते जिंकलेली रक्कम आसाम आणि बिहारच्या मदतीसाठी दान करणार आहे.