अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर शहर उपविभागातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले किंवा चोरीला गेलेले एकूण 87 मोबाईल हँडसेट शोधून काढण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या जप्त करण्यात आलेल्या सर्व मोबाईल हँडसेटची एकूण बाजारभावातील किंमत 18 लाख 85 हजार रुपये इतकी आहे.
अहिल्यानगर शहर उपविभागातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि तपास करून हस्तगत करण्यात आलेले मोबाईल उपविभागीय पोलिस अधिकारी, अहिल्यानगर शहर विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/06/nashikmajor-action-by-the-food-and-drug-administration-in-nashik-258-kg-stock-of-motichoor-ladoos-seized/
या कारवाईमध्ये अहिल्यानगर शहर उपविभागांतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनुसार कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतून एकूण 54 मोबाईल हँडसेट शोधण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत 14 लाख रुपये इतकी आहे. तोफखाना पोलिस स्टेशन हद्दीतून एकूण 25 मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत 4 लाख रुपये आहे. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतून एकूण 8 मोबाईल हँडसेट शोधण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत 85 हजार रुपये इतकी आहे. अशा प्रकारे तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण 87 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.
https://www.prahaar.in/2026/11/06/marathwada-water-grid-project-jica-approves-20000-crore-funding-drought-relief-maharashtra/
ही कामगिरी अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि अहिल्यानगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. या यशस्वी तपासात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलिस नाईक महेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल सचिन बाचकर व पोलिस कॉन्स्टेबल संदीप थोरात आदी अधिकारी आणि अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही कामगिरी फत्ते केली आहे.