Home महाराष्ट्र नाशिक Nashik : सप्तशृंगी गडावर दुर्दैवी घटना ! शितकड्यावरून उडी घेत 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

Nashik : सप्तशृंगी गडावर दुर्दैवी घटना ! शितकड्यावरून उडी घेत 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

0
Nashik : सप्तशृंगी गडावर दुर्दैवी घटना ! शितकड्यावरून उडी घेत 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

कळवण : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. कळवण तालुक्यातील जामशेद येथील २४ वर्षीय राहुल भाऊराव साबळे याने शितकड्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. ६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे जामशेद गावासह अभोणा परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावाजवळ असलेल्या शितकड्यावर ही घटना घडली. राहुल साबळे याने उडी घेण्यापूर्वी स्वतःचा व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती गडावरील संदीप बेनके यांनी नांदुरी पोलिसांना दिली. त्यानंतर नांदुरी पोलिसांनी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

https://www.prahaar.in/2026/11/06/nashik-crime-sensation-at-nashik-road-central-jail-prison-guard-attempts-to-smuggle-charas-cannabis-resin-33-grams-seized/

सकाळी शोधमोहीमेत मृतदेह आढळला

अंधारामुळे बचाव आणि शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता पुन्हा परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी शितकड्याच्या खालील सपाट भागात, वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात राहुलचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

दिवाळीच्या सणात जामशेद गावावर शोककळा

राहुल साबळे याचा अभोणा येथे रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय होता. तो स्वभावाने हसतमुख आणि आनंदी असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जामशेद गावासह अभोणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राहुलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here