Home ब्रेकिंग न्यूज Kirit Somaiya letter to CM : मुंबईतील हिंदू-मुस्लिम जन्मदराच्या अभ्यासासाठी विशेष समिती नेमा! भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Kirit Somaiya letter to CM : मुंबईतील हिंदू-मुस्लिम जन्मदराच्या अभ्यासासाठी विशेष समिती नेमा! भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0
Kirit Somaiya letter to CM : मुंबईतील हिंदू-मुस्लिम जन्मदराच्या अभ्यासासाठी विशेष समिती नेमा! भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचा दावा

मुंबई : मुंबईतील लोकसंख्येतील बदलाचा मुद्दा उपस्थित करत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदराच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे. मुंबईत मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचा दावा करत त्यांनी गेल्या पाच वर्षांतील जन्मनोंदणीची आकडेवारी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली.

https://www.prahaar.in/2026/11/06/big-news-for-st-bus-passengers-extension-of-deadline-for-ncmc-card-for-women-and-senior-citizens/

सोमय्या यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये मुंबईत ७० हजार ३८० हिंदू मुलांचा, तर ४८ हजार ५५४ मुस्लिम मुलांचा जन्म झाला. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीत ३ लाख ३६ हजार ६२५ हिंदू मुलांचा आणि २ लाख २० हजार ७५४ मुस्लिम मुलांचा जन्म झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आकडेवारीच्या आधारे हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्माचे प्रमाण ३:२ असल्याचा दावा त्यांनी केला.

मुंबईतील काही भागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात बदल होत असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. या बदलांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी विशेष लोकसंख्याशास्त्रीय समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. जन्मदराशी संबंधित आकडेवारीची पडताळणी करून तिचा तपशील जनतेसमोर आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here