Home ताज्या घडामोडी Western Railway: विनातिकिट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल, फुकट्या प्रवाशांकडून 138 कोटींचा दंड वसूल

Western Railway: विनातिकिट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल, फुकट्या प्रवाशांकडून 138 कोटींचा दंड वसूल

0
Western Railway: विनातिकिट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल, फुकट्या प्रवाशांकडून 138 कोटींचा दंड वसूल
विनातिकिट प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वे मालामाल, फुकट्या प्रवाशांकडून 138 कोटींचा दंड वसूल फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहिम राबवून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल केला आहे. महसुलाचे रक्षण करण्याच्या आणि शिस्तबद्ध प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या ध्येयानुसार, पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, वरिष्ठ वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या पथकाने मुंबई उपनगरीय लोकल गाड्या, लांब पल्ल्याच्या मेल- एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या आणि हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसमध्ये सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमांचा उद्देश महसुलाचे नुकसान कमी करणे आणि प्रवासात शिस्त राखणे हा होता.

https://www.prahaar.in/2026/11/04/western-railway-platform-ticket-ban-bandra-terminal-surat-vapi-udhna-valsad-and-bhestan-this-6-station-diwali-crowd-control/

एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या काळात, विनातिकीट प्रवास करणारे, अनियमित तिकीट असलेले किंवा नोंदणी न केलेले सामान सोबत घेऊन प्रवास करणारे एकूण 17.93 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्या सर्व प्रवाशांकडून दंडाच्या माध्यमातून 138.05 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली. केवळ ऑक्टोबर 2026 या एका महिन्यात, विनातिकीट किंवा अनियमित तिकीट प्रवास करणाऱ्या 2.44 लाखांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली, ज्यातून 21.53 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला.

मुंबई उपनगरीय विभागात राबवलेल्या सखोल तिकीट तपासणी मोहिमेतूनही महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत, विनातिकीट किंवा अनियमित प्रवासाची एकूण 6.28 लाख प्रकरणे उघडकीस आली, ज्यातून सुमारे 36 कोटी रुपये वसूल करण्यात आले. हे पश्चिम रेल्वेची आपल्या उपनगरीय नेटवर्कवर शिस्तबद्ध आणि अधिकृत प्रवासाची खात्री देण्याबाबतची निरंतर बांधिलकी दर्शवते. याव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वे वातानुकूलित (AC) उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये सामान्य (नॉन-AC) तिकिटांवर प्रवास करणाऱ्या अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहिमा देखील राबवत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/04/siddhivinayak-trust-granted-exemption-from-stamp-duty-on-the-purchase-of-ram-mansion-decision-taken-to-facilitate-amenities-for-devotees/

एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत, वातानुकूलित (AC) उपनगरीय लोकलमध्ये अशा प्रकारची सुमारे 1.13 लाख प्रकरणे आढळून आली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 82 टक्क्यांहून अधिक प्रकरण दर्शवतेय. पश्चिम रेल्वेने अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी, रेल्वेचा महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शिस्तबद्ध प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सातत्यपूर्ण निष्ठेची आणि प्रयत्नांची दखल घेतली आहे. या निरंतर मोहिमांमुळे तिकीट प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यात आणि संपूर्ण पश्चिम रेल्वे नेटवर्कवर प्रवाशांचा एकूण अनुभव अधिक चांगला करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here