Home क्राईम Dombivli Crime : ‘मला रोज स्वप्नात तो दिसतोय…’; मित्राचा खून केल्यानंतर 20 दिवसांनी आरोपी पोलीस ठाण्यात; धक्कादायक कारण समोर

Dombivli Crime : ‘मला रोज स्वप्नात तो दिसतोय…’; मित्राचा खून केल्यानंतर 20 दिवसांनी आरोपी पोलीस ठाण्यात; धक्कादायक कारण समोर

0
Dombivli Crime : ‘मला रोज स्वप्नात तो दिसतोय…’; मित्राचा खून केल्यानंतर 20 दिवसांनी आरोपी पोलीस ठाण्यात; धक्कादायक कारण समोर
"मला रोज स्वप्नात तो दिसतोय..." मित्राचा खून केल्यानंतर २० दिवसांनी आरोपी पोलीस ठाण्यात; धक्कादायक कारण समोर! (Photo Google)

Crime News: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील मोठागाव परिसरात मित्राच्या हत्येचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. किरकोळ वादातून मित्राला मारहाण करून त्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या 24 वर्षीय प्रभू करकडे याने घटनेच्या 20 दिवसांनंतर विष्णूनगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. मृत मित्र स्वप्नात येत असल्याने भीती आणि पश्चात्तापातून आपण पोलिसांसमोर हजर झाल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती आहे.

https://www.prahaar.in/2026/11/04/supporting-waste-pickers-municipal-corporation-selects-a-registered-organization-to-operate-at-five-locations/

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू करकडे हा घरगुती कामगार असून त्याचा 43 वर्षीय मित्र पल्लव ऊर्फ विशाल मधुकर कदम याच्यासोबत दारू पिण्यावरून वाद झाला. या वादातून प्रभूने विशालच्या पायांवर आणि शरीरावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन विशालचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. (Murder news)

मृतदेह पिशवीत भरून निर्जन ठिकाणी टाकला

विशालचा मृत्यू झाल्यानंतर प्रभू घाबरला. त्याने आपल्या भाड्याच्या घराचे मालक संदेश म्हात्रे यांना फोन केला. त्यानंतर दोघांनी मिळून विशालचा मृतदेह मोठ्या पिशवीत भरला आणि रात्रीच्या वेळी कॉपर लिंक रोड परिसरातील निर्जन गवताळ भागात फेकून दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने हत्या उघड होणार नाही, असे आरोपीला वाटत होते.

20 दिवस स्वप्नात मृत मित्र दिसत असल्याचा दावा

मात्र, घटनेनंतर प्रभूला मानसिक त्रास होत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मृत विशाल वारंवार स्वप्नात येत असल्याने भीती वाटत होती आणि झोपही लागत नव्हती, असा दावा त्याने केला. अखेर घटनेच्या 20 दिवसांनंतर त्याने विष्णूनगर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

दोघांना अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

प्रभूने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी कॉपर लिंक रोड परिसरातून विशाल कदम यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणात मुख्य आरोपी प्रभू करकडे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचा आरोप असलेले घरमालक संदेश म्हात्रे या दोघांना अटक करण्यात आली. दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here