पनवेल: यंदा अल- निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची कमी हजेरी कमी पाहायला मिळाली. पावसाचे कमी प्रमाण आणि परतीचा पाऊसाने दिलेल्या निराशेमुळे राज्यात यंदा कमी पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. अपुऱ्या पावसामुळे पावसाळ्याच्या कालावधीतही अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 5 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, अल- निनोच्या प्रभावाचा विचार करून राज्यातील उपलब्ध जलसाठ्यांचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/02/which-areas-in-navi-mumbai-will-be-affected-by-the-water-supply-cut-following-the-10-hour-shutdown-announced-by-nmmc-for-3rd-november-2026/
राज्य शासनाने महानगर पालिकांना आणि नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाणीगळती कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होण्याची शक्यता आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने सिडको प्रशासनानेही उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सिडको कार्यक्षेत्रातील विविध विभागांमध्ये, 15 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. प्रत्येक विभागामध्ये, आठवड्यातून एकदा 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार, नोव्हेंबर महिन्यापासून सिडको कार्यक्षेत्रामध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.
अल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून १५ टक्के पाणीकपात लागू
प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
CIDCO Implements 15% Water Cut Across Its Nodes; Appeals to Citizens for Judicious Use of Water
24-hour water supply shutdown once a week in each node; citizens urged to conserve drinking water
#cidcoupdate #watercut
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) November 2, 2026
सिडको कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या नियोजनानुसार खारघरमध्ये आठवड्यातील प्रत्येक सोमवारी, उलवे सेक्टर 2, 3, 5, 6, 19, 20, 22, 2३, 24, 25, 25-अ तसेच गव्हाण, कोपर व मोरावे येथे मंगळवारी, तर उलवे सेक्टर 8, 9, 10-ब, 15-क, 16, 17, 18 तसेच शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर आणि न्हावा खाडी या परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तळोजा येथे शुक्रवारी, तर द्रोणागिरी सेक्टर 1, 2, 11, 12, 15, 30, 47, 48, 50, 51, 52, 53, 54 आणि 55 तसेच धुतुम, भेडखळ, पागोटे, फुंडे, नवघर, नवघर पाडा, बोकरडवीरा आणि कुंडे या परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तर, नवीन पनवेल पूर्व परिसरात आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी आणि नवीन पनवेल पश्चिमेत आठवड्याच्या दर मंगळवारी, कळंबोली येथे बुधवारी, करंजाडे येथे गुरुवारी, तर कळुंद्रे आणि कामोठे येथे शुक्रवारी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
https://www.prahaar.in/2026/10/31/president-droupadi-murmu-inaugurates-nashik-trimbakeshwar-simhastha-kumbh-mela-2027-see-special-glimpses-in-five-photos/
सिडको कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या नियोजनानुसार प्रत्येक विभागामध्ये, पाणीकपातीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पाणी कपातीच्या वेळेमध्ये, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सिडको प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ आवश्यकतेपुरता करावा. वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. घरातील तसेच गृहनिर्माण संकुलातील पाण्याच्या साठवण टाक्या भरून वाहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. घरातील नळ अथवा जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी.
https://www.prahaar.in/2026/10/23/yugandhara-yuvati-sammelan-2026-navi-mumbai-mayor-sujata-patil-speech/
आवश्यकता नसताना नळ सुरु ठेवू नयेत. घरामध्ये साठवून ठेवलेले पाणी केवळ शिळे झाले आहे, या समजुतीने फेकून देऊ नये. तसेच शहरातील जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिडको क्षेत्रातील सर्व नागरिकांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करावा आणि या नियोजनात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सिडको प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात येत आहे.