Home क्राईम Cyber Crime : अरे बापरे…! सेंट्रल बँकेच्या खात्यातून थेट 13.96 कोटी रुपये गायब; नेमकं प्रकरण काय?

Cyber Crime : अरे बापरे…! सेंट्रल बँकेच्या खात्यातून थेट 13.96 कोटी रुपये गायब; नेमकं प्रकरण काय?

0
Cyber Crime : अरे बापरे…! सेंट्रल बँकेच्या खात्यातून थेट 13.96 कोटी रुपये गायब; नेमकं प्रकरण काय?
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटींची फसवणूक; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून 49 वर्षीय आरोपीला अटक (Google Photo)

Cyber Crime : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता थेट बँकेच्या खात्यातून कोट्यवधी रुपये लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मधील ट्रेझरी खात्यातून तब्बल 13.96 कोटी रुपये RTGS व्यवहारांद्वारे अनधिकृतपणे विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मेहुल सिमारिया (वय 49) याला अटक केली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/03/sangli-gopichand-padalkar-tasted-victory-in-the-sangli-district-bank-election-how-many-votes-did-he-receive/

187 अनधिकृत व्यवहारांद्वारे 13.96 कोटी रुपये वळवले

मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 15 आणि 17 तारखेला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी खात्यातून संशयास्पद RTGS व्यवहार करण्यात आले. बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेच्या सुरक्षित कम्युनिकेशन चॅनेलमधून RBI च्या पेमेंट प्रोसेसिंग सिस्टीमकडे पाठवल्या जाणाऱ्या व्यवहार प्रक्रियेत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप आहे.

या कथित छेडछाडीमुळे 187 अनधिकृत व्यवहारांद्वारे 13.96 कोटी रुपये खात्यातून डेबिट झाले. अवघ्या तीन दिवसांत ही रक्कम देशभरातील 36 वेगवेगळ्या बँकांमधील 107 लाभार्थी खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली.

आरोपीच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा

या प्रकरणाचा तपास करताना मेहुल सिमारिया याची भूमिका समोर आली. फसवणुकीतील सुमारे 1 कोटी रुपयांची रक्कम इतर खात्यांमध्ये वळवण्यापूर्वी आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल?

या प्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाच्या मुंबईतील नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2), 318(3), 318(4) आणि 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कलम 43, 66 आणि 66(D) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बँकेच्या सुरक्षित व्यवहार प्रणालीत कथितरीत्या छेडछाड करून एवढी मोठी रक्कम वळवण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पैशांचा पुढील प्रवास आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here