Home ब्रेकिंग न्यूज Nursing Admission 2026: नर्सिंगच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठा निर्णय; प्रवेशाची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर

Nursing Admission 2026: नर्सिंगच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठा निर्णय; प्रवेशाची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर

0
Nursing Admission 2026: नर्सिंगच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठा निर्णय; प्रवेशाची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर
Photo: AI Generated

Nursing Admission 2026:  राज्यातील विविध नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष पुन्हा एकदा शिथिल करण्यात आले असून, प्रवेशाची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. देशातील परिचारिका महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने भारतीय परिचर्या परिषदेने (आयएनसी) नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या तारखेनुसार प्रवेशाची अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबरवरून 15 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परिचारिका महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा होता त्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, नव्याने शिथिल करण्यात आलेले पात्रता निकष नेमके किती पर्सेंटाइलपर्यंत कमी करण्यात आलेले आहेत, याबाबत परिषदेने स्पष्टता केलेली नाही.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) देशभरातील परिचारिका महाविद्यालयांमध्ये अनेक जागा रिक्त असल्याने पात्रता निकष कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing), पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, एम.एस्सी. नर्सिंग, पीएच.डी. नर्सिंग, पोस्ट बेसिक डिप्लोमा आणि नर्स प्रॅक्टिशनर या सर्व अभ्यासक्रमांना हा निर्णय लागू आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/swayam-july-2026-big-news-for-students-the-registration-deadline-for-swayam-examinations-is-november-5th-apply-today/

यापूर्वी 16 ऑक्टोबरला परिषदेने पात्रता निकष कमी केले होते. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी 50 पर्सेंटाइलची अट 40 पर्सेंटाइलपर्यंत, तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी 35 पर्सेंटाइल, तर राखीव प्रवर्गासाठी 30 पर्सेंटाइलपर्यंत कमी करण्यात आली होती. आता पुन्हा निकष शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी नव्या निकषांची निश्चित मर्यादा अधिसूचनेत नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान हे निकष शून्य पर्सेंटाइलपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. शून्य पर्सेंटाईल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रिक्त जागांवर प्रवेशाची संधी उपलब्ध होऊ शकते. मात्र, इतर तांत्रिक व शैक्षणिक अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. (Nursing Admission 2026: )

दरम्यान, महाविद्यालयांना मंजूर वार्षिक प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. तसेच 15 नोव्हेंबरनंतर प्रवेशाची मुदतवाढ देखील होणार नसल्याचे सांगण्यात आले असून, अंतिम तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. जर कोणत्याही महाविद्यालयाने नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भारतीय परिचर्या परिषदेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here