Home क्रीडा IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पहिला विजय सोपा नाही, ऑकलँडमध्ये भारताचा असा आहे रेकॉर्ड

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पहिला विजय सोपा नाही, ऑकलँडमध्ये भारताचा असा आहे रेकॉर्ड

0
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पहिला विजय सोपा नाही, ऑकलँडमध्ये भारताचा असा आहे रेकॉर्ड
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पहिला विजय सोपा नाही, ऑकलँडमध्ये भारताचा असा आहे रेकॉर्ड (Photo: BCCI Twitter)

भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होणार आहे. या मैदानावर भारताचा वनडे रेकॉर्ड काही खास नाही. या मैदानावर न्यूझीलंड संघाचा वरचष्मा आहे. भारताने या मैदानात आतापर्यंत 11 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात विजय, सहा सामन्यात पराभव आणि एक सामना टाय झाला आहे. भारताने ऑकलँडच्या ईडन पार्कवर पहिला वनडे सामना 22 फेब्रुवारी 1976 रोजी खेळला होता. या सामन्यात सुनील गावस्कर यांच्याकडे नेतृत्व होतं आणि पहिल्याच सामन्यात 80 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर या मैदानात एकूण दहा सामने पार पडले. या झिम्बाब्वेविरुद्ध वनडे वर्ल्डकप 2015 मधील एक सामना आहे. या सामन्यात भारताने सहा विकेट राखून विजय मिळवला होता. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही नोव्हेंबर 2022 मध्ये शेवटचे भिडले होते. या सामन्यात भारताचा सात विकेटने पराभव झाला होता.

मागच्या सामन्यात काय झालं होतं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मागचा सामना 25 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता. या सामन्यात भारताने 50 षटकात 306 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 307 धावांचं आव्हान दिलं होतं. शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. पण हा सामना काही भारतीय संघाला जिंकता आला नाही. न्यूझीलंडने सात गडी गमवून 307 धावांचं लक्ष्य गाठलं. न्यूझीलंडने हे लक्ष्य 47.1 षटकात पूर्ण केलं होतं. या सामन्यात टॉम लॅथमने नाबाद 145 धावांची खेळी केली होती. तर केन विल्यमसनने अर्धशतक ठोकलं होतं.

https://www.prahaar.in/2026/11/02/ind-vs-nz-odi-seris-it-will-be-easy-to-score-century-for-virat-kohli-rather-than-rohit-sharma-former-cricketer-cheteshwar-pujara-makes-a-prediction/

भारत न्यूझीलंड सामना

भारत न्यूझीलंड वनडे मालिकेतील पहिला सामना 4 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. तसेच नाणेफेकीचा कौल हा सकाळी सात वाजता होईल. या सामन्यात विजय मिळवून आघाडी कोण घेईल? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-2 ने खिशात घातली आहे. त्यामुळे वनडे मालिकेतही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारताचा पहिल्या तीन सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर जबाबदारी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here