Home मनोरंजन रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट! 800 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला तमिळ चित्रपट

रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट! 800 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला तमिळ चित्रपट

0
रजनीकांत यांचा ‘जेलर 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट! 800 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला तमिळ चित्रपट

वयाच्या 75 व्या वर्षी सुपरस्टार रजनीकांत यांनी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. या कलाकाराने तमिळ चित्रपटसृष्टीला 800 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला चित्रपट दिला आहे. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जेलर 2’ या चित्रपटाने रविवारी (1 नोव्हेंबर) हा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर बॉलिवूडमधील काही ब्लॉकबस्टर चित्रपटांची एकूण कमाईदेखील मागे टाकली. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर 2’ या चित्रपटाने तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक नोंदवली आणि आपल्या चार दिवसांच्या विस्तारित ओपनिंग वीकेंडमध्ये 400 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाला आणखी चालना मिळाली.

नवरात्र आणि दसऱ्याच्या सुट्ट्यांमुळे आठवड्याच्या दिवसांमध्येदेखील चित्रपटाची गती कायम राहिली. पण ‘जेलर 2’ साठी विशेषतः उत्साहवर्धक बाब म्हणजे पहिल्या आठवड्यानंतर चित्रपटाने केलेली कामगिरी. चित्रपटाने दुसऱ्या विकेंडला जोरदार प्रतिसाद दर्शवला आणि आठवड्याच्या मध्यात आलेल्या घसरणीनंतर तिसऱ्या विकेंडमध्ये पुन्हा उभारी घेतली. रविवारी, चित्रपटगृहांमधील आपल्या 18 व्या दिवशी, ‘जेलर 2’ ने भारतात 11.50 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यामुळे तिसऱ्या विकेंडची कमाई 26.40 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आणि आतापर्यंतची एकूण देशांतर्गत कामे 456कोटी रुपये निव्वळ झाली आहे. भारतात 450 कोटी रुपये कमावणारा ‘जेलर 2’ हा एकमेव तमिळ चित्रपट आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/trouble-mounts-for-nora-fatehi-court-alleges-actresss-conduct-is-inappropriate/

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये किमान 60 कोटी रुपयांची कमाई करणारा हा एकमेव तमिळ चित्रपट ठरला आहे. परदेशातही ‘जेलर 2’ ला तितकेच मोठे यश मिळाले आहे. याचे मुख्य श्रेय आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेतील रजनीकांत यांच्या प्रचंड लोकप्रियतेला जाते. ‘जेलर 2’ ने परदेशात जवळपास 29 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे, जी रणवीर सिंगच्या धुरंधरच्या कमाईइतकीच आहे. यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 808 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच 800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला तमिळ चित्रपट ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here