Home ब्रेकिंग न्यूज Bhandup : भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून 30 जणांना विषबाधा; नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल

Bhandup : भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून 30 जणांना विषबाधा; नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल

0
Bhandup : भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून 30 जणांना विषबाधा; नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल
भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून 30 जणांना विषबाधा; नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल (Photo AI )

Mumbai News: लग्नसमारंभातील भोजनानंतर नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना भांडुप-नाहूर परिसरात घडली आहे. 1 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या या प्रकारात सुमारे 27 ते 30 जणांना त्रास झाला. त्यांना मुलुंड आणि विक्रोळी येथील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ( Bhandup Food Poisoning)

https://www.prahaar.in/2026/11/02/trouble-mounts-for-nora-fatehi-court-alleges-actresss-conduct-is-inappropriate/

शेवटच्या पंगतीतील पाहुण्यांना त्रास

नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये 1 नोव्हेंबर रोजी लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास 400 जणांनी भोजन केले होते. मात्र, शेवटच्या पंगतीत जेवण केलेल्या 27 ते 30 जणांना काही वेळानंतर पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.

रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्रास वाढल्याने काही रुग्णांना मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतरांना मुलुंडच्या कामगार रुग्णालयात आणि विक्रोळी येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू

रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. एका महिलेने स्वतःहून रुग्णालयातून सुटी घेतली असून, इतर रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे रुग्णांची प्रकृती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

एम. टी. अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजूसिंग राठोड यांनी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. काही रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, इतरांवर उपचार सुरू आहेत.

केटरिंग चालकाच्या निष्काळजीपणाचा आरोप

या घटनेनंतर नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी जेवणाचे कंत्राट घेतलेल्या केटरिंग व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात असल्याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here