Home ताज्या घडामोडी नकली नाण्यांचा काळा बाजार उघड; 1 लाखांच्या बनावट नाण्यांसह चौघेजण ताब्यात

नकली नाण्यांचा काळा बाजार उघड; 1 लाखांच्या बनावट नाण्यांसह चौघेजण ताब्यात

0
नकली नाण्यांचा काळा बाजार उघड; 1 लाखांच्या बनावट नाण्यांसह चौघेजण ताब्यात
नकली नाण्यांचा काळा बाजार उघड; 1 लाखांच्या बनावट नाण्यांसह चौघेजण ताब्यात फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नवी दिल्ली: दिल्ली क्राइम ब्रँचने खोटी नाणी बनवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. दिल्लीच्या क्राइम ब्रँचने 20 रूपयांच्या नाणी बनवणाऱ्यांचा आणि मार्केटमध्ये सप्लाय करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या WR-1 पथकाने मुंडका मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या एका टोयोटा एटिओस कारमधून नाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. कारमधून हा सर्व साठा जप्त करत पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. किती बनावट नाणी चलनामध्ये आणल्या गेल्या आहेत, याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/01/central-government-releases-additional-instalment-of-tax-devolution-of-rs-1-09-lakh-cr-to-states/

कारवाईदरम्यान, पोलिसांनी अंदाजे 1 लाख रुपयाची बनावट नाणी जप्त केली आहेत. बनावट नाणींसह पारस जैन नावाच्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. गाडीच्या मागच्या सीटवर 100 बनावट नाणी असलेली पन्नास पॉलिथिन पाकिटे सापडली. या प्रकरणात मुख्य आरोपी उपकार लुथरा उर्फ ​​अभय प्रताप सिंग याच्यासह आणखीन चार आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासात इतर तिघांची भूमिकाही उघड झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 1 लाख रुपये दर्शनी मूल्य असलेली ही बनावट नाणी अंदाजे 70,000 रुपयांना पुरवली जात होती.

 

याशिवाय, अभय प्रताप सिंग याचा बनावट नाणी बनवण्याचा कारखाना पूर्वी हरियाणातील सोनीपत येथे सुरू होता, जो नंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे हलवण्यात येत होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी बनावट नाणी, एक कार, एक आयफोन आणि एक लॅपटॉप बॅग जप्त केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या टोळीचे संपूर्ण जाळे उघडकीस आणण्याचे काम करत आहेत. या टीमने कोणकोणत्या राज्यामध्ये हे बनावट नाणी चलनामध्ये आणल्या आहेत? याचा तपास सुद्धा पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीमध्ये आणखीन कोणकोणते धागे दोरे समोर येतात? हे आता चौकशी अंती समोर येईल.

https://www.prahaar.in/2026/11/01/ujjain-hotel-tragedy-four-workers-die-due-to-toxic-gas-leak-while-cleaning-tank-sparks-panic-in-the-area/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here