भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा निकाल 3-2 असा लागला. भारताने या तीन सामने जिंकल्याने मालिका खिशात घातली. पण चौथ्या आणि पाचव्या टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला. पाचव्या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान न्यूझीलंडने सहज गाठलं. न्यूझीलंडने हा सामना 3 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात टिम सैफर्टने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याच्या खेळीमुळेच भारताचा पराभव निश्चित झाला. न्यूझीलंडने भारताने दिलेलं लक्ष्य 18व्या षटकातच पूर्ण केलं.
न्यूझीलंडचा डाव
भारताने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिलाच धक्का बसला. फिन एलन अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर टिम सैफर्ट आणि डॅरेल मिचेल ही जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला. डॅरेल मिचेल 16 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. पण एका बाजूने टिम सैफर्टने किल्ला लढवला आणि आक्रमक फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने 50 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 93 धावा करून बाद झाला. त्यानंतर ग्लेन फिलिप्स सामना पुढे नेला. त्याने विजयाच्या दिशेने कूच करत असताना अर्धशतक ठोकलं.
https://www.prahaar.in/2026/11/01/ind-vs-nz-will-rishabh-pant-play-in-new-zealand-what-about-jasprit-bumrah-and-ravindra-jadeja/
भारताचा डाव
भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाले. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 चेंडूत 93 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर पुन्हा एकदा डाव गडगडला. तिलक वर्मा अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. नमन धीरची खेळीही संथ होती. त्याने 23 चेंडूत 33 धावांची खेळी केली. तर नितीश कुमार रेड्डी 17 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारनेही 4 चेंडूचा सामना केला आणि 4 धावा करून तंबूत परतला.