Home एक्सक्ल्युजिव्ह Nashik Kumbh Mela Dhwajarohan: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ!

Nashik Kumbh Mela Dhwajarohan: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ!

0
Nashik Kumbh Mela Dhwajarohan: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ!

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (३१ ऑक्टोबर) रामकुंड आणि कुशावर्त येथे ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर कुशावर्त येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२:०२ वाजता ‘महाध्वजारोहण’ संपन्न होईल. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिक येथील रामकुंडावर दाखल झाल्या असून धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत यज्ञाला सुरुवात झाली असून या नंतर त्या गोदावरी पूजन करतील.
या शुभप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित आहेत.
पवित्र रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन
गोदाघाटावर भक्तिमय वातावरण ! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गोदावरी पूजन
रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य पूजाविधी सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here