नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (३१ ऑक्टोबर) रामकुंड आणि कुशावर्त येथे ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर कुशावर्त येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२:०२ वाजता ‘महाध्वजारोहण’ संपन्न होईल. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नाशिक येथील रामकुंडावर दाखल झाल्या असून धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे.




