नाशिकमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळ्याचं पर्व सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर या पर्वाला सुरुवात होते. 31 ऑक्टोबर 2026 रोजी, दुपारी 12.02 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर ध्वजारोहण होणार आहे. यानंतर कुंभमेळा पर्वाला अधिकृतरित्या सुरूवात होईल. नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे.