Home महाराष्ट्र अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन; पशुधनाच्या सर्वेक्षणासह चारा लागवडीला वेग

अहिल्यानगरमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन; पशुधनाच्या सर्वेक्षणासह चारा लागवडीला वेग

0
अहिल्यानगरमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन; पशुधनाच्या सर्वेक्षणासह चारा लागवडीला वेग
अहिल्यानगरमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन; पशुधनाच्या सर्वेक्षणासह चारा लागवडीला वेग (Photo : AI Generated)

जिल्ह्यामध्ये सध्या दीड ते दोन महिने पुरेल इतका चारा शिल्लक असून, संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता वेगाने उपाययोजना सुरू करण्यात आले आहे. सिंचनाखालील शेतकऱ्यांना चारा लागवडीचे आवाहन करण्यात आले असून डिबीटी पोर्टलद्वारे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वेळप्रसंगी जिल्हा बाहेरून किंवा इतर ठिकाणाहून चाऱ्याची उपलब्धता सरकारमार्फत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईचा आढावा घेण्यासाठी महसूल व कृषी प्रशासनाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाला मोठा वेग आला आहे. 28 ऑक्टोबर 2026 अखेर जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये मिळून एकूण 2 लाख 30 हजार 123 नोंदी पूर्ण झाल्या आहेत. आदल्या दिवसापर्यंतच्या 2 लाख 22 हजार 640 नोंदींमध्ये अवघ्या 24 तासांत 7 हजार 483 नव्या नोंदींची भर पडली आहे. तालुकानिहाय आकडेवारीत श्रीगोंदा, संगमनेर आणि शेवगाव हे तालुके आघाडीवर असून, यंदा पावसाची तूट आणि खरीप पिकांच्या नुकसानीमुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक 19 हजार 972 नोंदी नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात 19 हजार 373, शेवगावमध्ये 19 हजार 324, पाथर्डीत 18 हजार 508, अकोलेमध्ये 17 हजार 925 आणि कोपरगाव तालुक्यात 17 हजार 915 नोंदी झाल्या आहेत. या शिवाय नगर तालुक्यात 17 हजार 470, नेवाशात 16 हजार 699, राहुरीत 16 हजार 665, राहात्यात 15 हजार 63, पारनेरमध्ये 14 हजार 255 आणि कर्जत तालुक्यात 13 हजार 880 नोंदींची नोंद झाली आहे. तर श्रीरामपूर तालुक्यात 11 हजार 983 आणि जामखेड तालुक्यात 11 हजार 91 नोंदी पूर्ण झाल्या आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/29/devendra-fadnavis-directs-creation-of-independent-technology-platform-for-taxi-drivers-to-curb-ola-uber-monopoly/

28 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात नोंदवण्यात आलेल्या 7 हजार 483 नोंदींमध्ये संगमनेर तालुक्याने बाजी मारत सर्वाधिक 1 हजार 118 नोंदींची भर घातली. तसेच श्रीगोंदा तालुक्यात 837, पारनेरमध्ये 801, नेवाशात 665, अकोलेत 641 आणि राहाता तालुक्यात 571 नोंदी करण्यात आल्या. राहुरी तालुक्यात 546, कर्जतमध्ये 473, नगरमध्ये 401, पाथर्डी आणि श्रीरामपूरमध्ये प्रत्येकी 343, शेवगावमध्ये 314, जामखेडमध्ये 223, तर कोपरगाव तालुक्यात 200 नोंदींची नोंद झाल्याचे ते म्हणाले.

यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि खरीप पिकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याने शेती क्षेत्र संकटात सापडले आहे. अशा स्थितीत दुग्धव्यवसाय आणि पशुधन टिकवून ठेवण्यासाठी हिरवा व वाळलेला चारा पुरेसा उपलब्ध असणे आवश्यक आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यास पशुपालकांना महागड्या दराने बाहेरून चारा खरेदी करावा लागेल, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होऊन दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, या सर्वेक्षणातील माहितीच्या आधारे टंचाईग्रस्त भागांची अचूक ओळख पटवून प्रशासनाला वेळेवर उपाययोजना आखणे सोपे जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here