Home ब्रेकिंग न्यूज पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

0
पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (फोटो सौजन्य: @SunetraA_Pawar X)

पुणे: पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पाणी उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई आणि आगामी काळातील पाणी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. तसेच शेती आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करताना, पुणे महानगरपालिकेने उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून प्रभावी नियोजन करावे, असे सांगण्यात आले. तसेच पुणे महानगरपालिकेला 13 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/10/29/devendra-fadnavis-directs-creation-of-independent-technology-platform-for-taxi-drivers-to-curb-ola-uber-monopoly/

यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि अधिकार्यांनी लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुष्काळाच्या काळातील पाणी नियोजनाच्या कार्याची आवर्जून आठवण केली. अजितदादा ज्या पद्धतीने दुष्काळी परिस्थितीत काटेकोर नियोजन करायचे, त्याच धर्तीवर पाणी व्यवस्थापन करावे, अशी आग्रही मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावर त्यांनी याविषयी सविस्तर माहिती घेऊन त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन बैठकीच्या शेवटी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here