Home मनोरंजन Prajakta Mali: प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग!

Prajakta Mali: प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग!

0
Prajakta Mali: प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग!
social media
मराठसिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचा लुकमुळे आणि चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असते. आताही ती तिचा पोस्टमुळे ट्रोल होताना दिसत आहे. तिला प्रेक्षकांच्या कमेंट्सचा सामना करावा लागत आहे.

 

प्राजक्ता माळी सध्या तिचा नवीन येणाऱ्या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ती लवकरच आदिनाथ कोठारे सोबत चित्रपटाचा मुख्यभूमीकेत दिसणार आहे. प्राजक्ता माळी सोशियल मीडियाचा माध्यमातून चात्यांशी संपर्क साधतच असते. तिचा पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिने शेअर केलेल्या फोटोसमुळे ट्रॉल होताना दिसते आहे.

 

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जगत् पिता ब्रम्हा मंदिर पुष्कर, (राजस्थान) येथील दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

प्राजक्ताने दर्शन घेतल्यानंतर फोटो शेअर करत, सबंध जगात ब्रम्हाजींची खूप कमी मंदिरे आहेत, हे सर्वात प्रसिद्ध. ब्रम्हदेवाने आपल्या मंत्रोच्चाराने एक स्त्री निर्माण केली. तीला वाणी, बुद्धी, वेदांचं सामर्थ्य दिलं. जगातील सर्व मनुष्यांच्या जीभेवर सदैव नृत्य करशील असा आशिर्वाद दिला. ती इतकी सुंदर निपजली की जेव्हा ती प्रकटली तेव्हा स्वतः ब्रम्हदेव तीच्यावर भाळले.

 

पुढे ती असे ही म्हणाली, स्वतः जन्म दिलेल्या मुलीवर भाळले म्हणून भगवान शिवानं त्यांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांना कोणी पूजणार नाही. पुणे विद्यापीठात नृत्यांचं शिक्षण घेत असताना “सरस्वती कौतूकम् “ मध्ये ही कथा मी सादर करायचे, त्याची आज खूप आठवण आली.

 

तिचा या पोस्टमुळे ती खुप ट्रोल होताना दिसत आहे. काहींनी तिला अस ही म्हंटल आहे कि, ‘घरचे देव आधी पाळायचे आणि मग बाहेरचे. ‘घरची कुळ देवी आणि घरचे कुळ दैवत पहिले’ असे ही म्हंटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here