Home ब्रेकिंग न्यूज Attack on Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ वा आरोपी अटकेत; ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Attack on Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ वा आरोपी अटकेत; ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

0
Attack on Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ वा आरोपी अटकेत; ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ व्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्रांजल ठकराल (वय 22) असे त्याचे नाव असून शुक्रवारी मध्यप्रदेशातील इंदूर येथून त्याला अटक करण्यात आली. तपासात असे उघड झाले आहे की, प्रांजलने सूत्रधार अनिल पंडितच्या सांगण्यावरून गोळीबार केला आणि या घटनेत सहभागी असलेल्या एका शूटरला दुसरे पिस्तूल पुरवले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा भाग म्हणून अमेरिकेतून कार्यरत असल्याचा संशय असलेल्या अनिल पंडितने टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा कट रचला होता. मारेकऱ्यांसाठी रसद आणि निधीची व्यवस्था करण्यासह या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रांजलवर सोपवण्यात आली होती.

पोलिसांचा मागोवा चुकवण्यासाठी पंडित आणि ठकराल संपर्कात राहण्याकरिता एका गुप्त मेसेजिंग ॲप्लिकेशनचा वापर करत असत. ठकरलच्या फोनमधून मिळालेल्या त्यांच्या चॅट्सचे विश्लेषण, तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी, यांमुळे तपास अधिकाऱ्यांना पंडितच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा माग काढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

https://www.prahaar.in/2026/10/21/all-three-accused-in-tiger-shroff-attack-case-remanded-in-police-custody-till-october-31/

प्रांजल ठकराल कोण आहे?

प्रांजल हा 22 वर्षांचा असून त्याने अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केला आहे. मार्च महिन्यातच त्याची जामिनावर सुटका झाली होती. अनिल पंडितच्या सांगण्यावरून पानिपतमध्ये एका व्यापाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी तो तुरुंगात होता. सुटका होताच त्याने मुंबईच्या जुहूमध्ये टायगर श्रॉफवर हल्ला करण्याचा कट रचण्यासाठी पंडितसोबत हातमिळवणी करण्यास सुरुवात केली. सध्या परदेशात लपून बसलेल्या मुख्य आरोपी पंडितपर्यंत पोहोचण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रयत्नांमध्ये ठकराल एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याला रविवारी किल्ला न्यायालयाच्या खंडपीठासमोर हजर करण्यात आले आणि 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

रविवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. ही घटना जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात घडली. टायगर श्रॉफ एका मैदानावर फुटबॉल मॅच खेळून त्याच्या कारमधून घरी परतत होता. तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. याच गर्दीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगरच्या गाडीवर 5 ते 6 राऊंड गोळीबार केला आणि तिथून पळ काढला.या प्राणघातक हल्ल्यात अभिनेता सुखरूप बचावला, पण गाडीच्या चालकाला आणि चाहत्याला गोळी लागली. तीन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला घडवला. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिस आणि कोटा पोलिस यांच्या एकत्रित तपासात तीन संशयितांना सोमवारी सकाळी राजस्थानातील कोटा येथून ताब्यात घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here