Home ब्रेकिंग न्यूज Solapur Accident News: तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

Solapur Accident News: तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

0
Solapur Accident News: तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

Solapur News: तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून, 6 जण जखमी झाले आहेत. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील नळदुर्ग बायपासजवळ ही घटना घडली. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Solapur Accident)

https://www.prahaar.in/2026/10/23/threat-to-blow-up-amitabh-bachchans-jalsa-bungalow-with-a-bomb-stir-in-mumbai/

नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बसवकल्याण येथील काही भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरच्या दिशेने पायी जात होते. यावेळी नळदुर्ग बायपासजवळ मागून आलेल्या कंटेनरने भाविकांना जोरदार धडक दिली. या धडकेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 6 जण जखमी झाले. (Accident News)

जखमींना रुग्णालयात दाखल

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कंटेनरखालून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण असून, मृत व्यक्तीची आणि जखमींची सविस्तर माहिती अद्याप समोर येणे बाकी आहे.

महामार्गावरील अपघातांची चिंता

काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला बसने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर भाविकांचा अपघात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या अपघाताबाबत पोलीस पुढील तपास करत असून, दुर्घटनेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here