Home क्रीडा भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन चेंडूत रचला विश्वविक्रम, 1430 दिवसानंतर केली कामगिरी

भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन चेंडूत रचला विश्वविक्रम, 1430 दिवसानंतर केली कामगिरी

0
भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन चेंडूत रचला विश्वविक्रम, 1430 दिवसानंतर केली कामगिरी
भारतीय क्रिकेट संघात भुवनेश्वर कुमारचं पुनरागमन झालं. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात खेळत आहे. त्याने 1430 दिवसानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत गोलंदाजी केली. पहिलं षटक टाकताना पहिल्या दोन चेंडूवर एक खास विक्रम आपल्या नावावर केला. (Photo: ANI)
भुवनेश्वर कुमारचं नाव प्लेइंग 11 येताच विक्रम रचणार हे स्पष्ट झालं होतं. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमारने पहिली दोन चेंडू निर्धाव टाकले. यासह त्याने एक विक्रम मोडला आणि आपल्या नावावर रचला. (Photo: ANI)
भुवनेश्वर कुमारने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमधेय सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम रचला आहे. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 893 चेंडू निर्धाव टाकले आहेत. (Photo: ANI)
भुवनेश्वर कुमार स्विंगमध्ये मास्टर आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतही सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले आहेत. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये 1944 चेंडू निर्धाव टाकले आहेत. (Photo: ANI)
भुवनेश्वर कुमारसाठी न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका खूपच महत्त्वाची आहे. कारण त्याने न्यूझीलंडविरुद्ध 2022 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर याच संघाविरुद्ध कमबॅक केलं आहे. (Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here