तब्बल ६५ वर्षांनंतर नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये हा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले तसेच महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणाऱ्या भेटवस्तू देखील देण्यात आल्या.





