Home क्रीडा IND vs NZ: पहिल्या टी20 सामन्यात 7 धावा करताच इशान किशन रचणार इतिहास, रिझवानचा विक्रम मोडणार

IND vs NZ: पहिल्या टी20 सामन्यात 7 धावा करताच इशान किशन रचणार इतिहास, रिझवानचा विक्रम मोडणार

0
IND vs NZ: पहिल्या टी20 सामन्यात 7 धावा करताच इशान किशन रचणार इतिहास, रिझवानचा विक्रम मोडणार
न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका होत आहे. ही मालिका इशान किशनसाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन तीन मोठे विक्रम प्रस्थापित करण्याच्या जवळ आहे. (Photo: ANI)
टी20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. या मालिकेत इशान किशन इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. एका कॅलेंडर वर्षात भारतीय खेळाडूने केलेल्या सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावांचा सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडण्यापासून इशान किशन फक्त 7 धावा दूर आहे. (Photo: ANI)
सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 1164 टी20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. आता हा विक्रम न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोडण्याची शक्यता आहे. कारण इशानने यावर्षी आतापर्यंत 34 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 1158 धावा केल्या आहेत. (Photo: ANI)
इशान किशन कसोटी खेळणाऱ्या देशाच्या फलंदाजांच्या यादीत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रमही मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. हा विक्रम सध्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. रिझवानने 2021 मध्ये 1326 धावा केल्या होत्या. हा टप्पा गाठण्यासाठी ईशानला आणखी 139 धावांची गरज आहे. (Photo: ANI)
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी इशान किशनला फक्त 46 धावांची गरज आहे. अशी कामगिरी करताच सातवा भारतीय फलंदाज ठरेल. इशानने 66 सामन्यांमध्ये 31.51 च्या सरासरीने आणि 148.81 च्या स्ट्राइक रेटने 1954 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo: ANI)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पलीकडे इशान आणखी एक विक्रम रचू शकतो. एका कॅलेंडर वर्षात 2000 टी20 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो. यासाठी त्याला फक्त 240 धावा पाहीजेत. त्याच्या नावावर आता 1760 धावा आहेत. आतापर्यंत फक्त वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने 2024 या वर्षी 2331 धावा केल्या आहेत. वर्ष संपण्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पाच टी20 आणि डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आहे. (Photo: ANI)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here