Home ब्रेकिंग न्यूज Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

0
Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन मुख्य आरोपींना मुंबई न्यायालयाने 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना 19 ऑक्टोबर रोजी राजस्थानातील कोटा येथून मुंबईत आणण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये हरियाणातील सोनिपत येथील रेहान उर्फ सुक्का, मूळचा बिहारमधील बेगुसराईचा आणि मुंबईत राहणारा हृतिक कुर्मी उर्फ रोशन आणि हरियाणातील फुल सिंग यांचा समावेश आहे.

गुन्हे शाखेने या तिन्ही आरोपींना दंडाधिकारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत करायची आहेत, असे तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले आणि आरोपीने दोन फोन नष्ट केल्याचा आरोप केला. घटनेमागील कट आणि हेतू उघडकीस आणण्यासाठी कोठडी आवश्यक होती, असे पोलिसांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले. तिघांच्या पोलीस कोठडीला त्यांचे बचाव वकील अजिंक्य मिर्गल आणि सत्यब्रत जोशी यांनी विरोध केला. शस्त्रे जप्त करण्यासाठी कोठडीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यांनी आपल्या निवेदनात हेदेखील अधोरेखित केले की, आरोपी ट्रान्झिट रिमांडवर असताना त्यांची चौकशी करण्यात आली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

https://www.prahaar.in/2026/10/21/4-people-including-two-women-arrested-in-tiger-shroff-related-firing-case-accused-of-bringing-weapons-into-mumbai/

नेमकी घटना काय?

रविवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. ही घटना जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात घडली. टायगर श्रॉफ एका मैदानावर फुटबॉल मॅच खेळून त्याच्या कारमधून घरी परतत होता. तिथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. याच गर्दीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगरच्या गाडीवर 5 ते 6 राऊंड गोळीबार केला आणि तिथून पळ काढला.या प्राणघातक हल्ल्यात अभिनेता सुखरूप बचावला, पण गाडीच्या चालकाला आणि चाहत्याला गोळी लागली. तीन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला घडवला. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिस आणि कोटा पोलिस यांच्या एकत्रित तपासात तीन संशयितांना सोमवारी सकाळी राजस्थानातील कोटा येथून ताब्यात घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here