Home क्रीडा वाघ शिकार करणं सोडत नाही…! आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी गांगुली-युवराजनंतर दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक डाव

वाघ शिकार करणं सोडत नाही…! आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी गांगुली-युवराजनंतर दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक डाव

0
वाघ शिकार करणं सोडत नाही…! आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी गांगुली-युवराजनंतर दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक डाव
वाघ शिकार करणं सोडत नाही...! आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी गांगुली-युवराजनंतर दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक डाव (Photo: BCCI Twitter)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्सनंतर दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझी कमनशिबी आहे. एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. आतापर्यंत संघात दिग्गज खेळाडू खेळून गेले. पण यश काही मिळालं नाही. पण आयपीएल 2027 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने फासे टाकले आहेत. आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. मुख्य प्रशिक्षकपदी सौरव गांगुली यांची नियुक्ती केली आहे. तर फलंदाज प्रशिक्षकांची जबाबदारी युवराज सिंगच्या खांद्यावर टाकली आहे. आता गोलंदाज प्रशिक्षकाची निवड करत क्रीडाप्रेमींना धक्का दिला आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा याची फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आयपीएल स्पर्धेत आपल्या फिरकी आणि गुगलीच्या जोरावर फलंदाजांना चकवणारा अमित मिश्रा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला व्हिडीओ

दिल्ली कॅपिटल्सने अमित मिश्रा प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अमित मिश्रा आणि दिल्लीचं नातं या माध्यमातून अधोरेखित करण्यात आलं आहे. अमित मिश्रा यांनी सांगितलं की, खेळाडू म्हणून अमित मिश्रा पहिल्या पर्वात दिल्लीकडून खेळला होता. आता प्रशिक्षक म्हणून या संघासोबत असणार आहे. या व्हिडीओ अमित मिश्रा म्हणाला की, ‘टाइगर कभी अपने शिकार को छोड़ता नहीं है और दिल्ली उनकी धड़कन है.’अमित मिश्रा 2008 पासून 2024 पर्यंत आयपीएल खेळला होता. तर 2003 मध्ये सौरव गांगुली कर्णधार असताना भारतीय संघात पदार्पण केलं होतं. आता सौरव गांगुलीच्या मुख्य प्रशिक्षणात अमित मिश्राही फिरकी गोलंदाजीचे धडे शिकवणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/20/indw-vs-zimw-indian-womens-team-gave-clean-sweep-to-zimbabwe-winning-the-third-t20-match-by-92-runs/

अमित मिश्रा याची आयपीएल कारकिर्द

अमित मिश्रा आयपीएल स्पर्धेत एकूण 162 सामने खेळला असून 174 विकेट काढल्या आहे. आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. तेव्हा त्याने 20 धावा देत एक विकेट काढली होती. त्याने 2008 मध्ये दिल्ली डेयरडेविल्सकडून डेक्कन चार्जर्सविरुद्ध, त्यानंतर 2011 मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळाला, 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी पुणे वॉरियर्सविरुद्ध हॅटट्रीक घेतली आहे. अमित मिश्राने भारतासाठी 22 कसोटी, 36 वनजे आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात एकूण 156 विकेट काढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here