Home ब्रेकिंग न्यूज धडाधड गोळ्या झाडल्या अन्… एका चुकीमुळे टायगर श्रॉफचा जीव वाचला, चौकशीत नेमकं काय समोर आलं?

धडाधड गोळ्या झाडल्या अन्… एका चुकीमुळे टायगर श्रॉफचा जीव वाचला, चौकशीत नेमकं काय समोर आलं?

0
धडाधड गोळ्या झाडल्या अन्… एका चुकीमुळे टायगर श्रॉफचा जीव वाचला, चौकशीत नेमकं काय समोर आलं?
फोटो सौजन्य: टायगर श्रॉफ (X Account)

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग केस प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फॉरेन्सिक तपासात असा खुलासा झालाय की, जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या बीएमडब्लू कारवर झालेल्या गोळीबारात हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलाचा वापर केलेला होता. हल्लेखोरांनी वापरलेलं ते पिस्तुल ‘कॉपी पिस’ असल्याचं बोललं जात आहे.

अभिनेत्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, अभिनेत्यावर पॉईंट ब्लँक रेंजवर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी गाडीच्या पुढच्या काचेवर आणि बाजूच्या खिडक्यांवर एकूण सात गोळ्या मारल्या. त्यापैकी पाच गोळ्या गाडीला लागल्या, तर दोन गोळ्यांचा नेम चुकला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचवी गोळी झाडल्यानंतर, पॅसेंजर साईडच्या खिडकीजवळ असलेला नेमबाज गाडीजवळ आला आणि त्याने अगदी जवळून टायगर श्रॉफवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.

https://www.prahaar.in/2026/10/19/breaking-three-arrested-in-connection-with-attack-on-tiger-shroff/

मात्र, टायगर या हल्ल्यातून एका छोट्याशा कारणामुळे बचावला आहे. ऐन शुट करतानाच शुटरची गन जाम झाल्याची माहिती आता चौकशीतून समोर आली आहे. हल्लेखोरांनी टायगरवर दोनवेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, परंतु गनमध्ये बिघाड झाल्यामुळे गोळीबार झाला नाही. असे मानले जाते की, याच कारणामुळे टायगरवर शुटरने जवळून गोळी झाडली नाही. त्यानंतर लगेचच शुटर मोटर सायकलवरून पळून गेले. या प्रकरणामध्ये तीन ते चार जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. सुदैवाने टायगर श्रॉफ या गोळीबारात थोडक्यात बचावला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गोळीबार करण्यापूर्वी परिसराची पाहणी केली. या तीन ते चार हल्लेखोरांनी टायगरची जुहूमधील पुष्पा पार्कजवळ सुमारे 45 मिनिटं वाट पाहिली. टायगरवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी मोटरसायकलवरून अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील पोलीस चौकीजवळ आले. तिथल्या सीसीटीव्हीच्या नजरेतून लपण्यासाठी त्यांनी तिथे जवळपास आपली मोटरसायकल सोडून थेट अंधेरी स्टेशन गाठलं. त्यानंतर पुढे, आरोपी सुरतच्या दिशेने निघाले. एफआयआरनुसार, तक्रारदार, फिरदोस इब्राहिम बलोच (47), गेल्या 28 वर्षांपासून टायगर श्रॉफ यांचे केअरटेकर म्हणून काम करत आहेत. शिवाय, ते अभिनेत्याची कार सुद्धा चालवतात.

https://www.prahaar.in/2026/10/19/major-update-on-the-condition-of-umesh-chavan-who-was-injured-in-the-shooting-incident-involving-tiger-shroffs-car-doctors-provide-crucial-information/

18 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास, टायगर श्रॉफ आणि फिरदोस हे सांताक्रूझ वेस्ट येथील एमएम मॅट्रिक्स जिममधून बीएमडब्ल्यू कार (MH-02-GE-0264) मधून विले पार्ले वेस्ट येथील जमुनाबाई नर्सरी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी निघाले. जेव्हा ते दोघे फुटबॉल खेळून परत येत होते, तेव्हा शाळेच्या मैदानाच्या गेटमधून बाहेर येऊन डावीकडे वळत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला या हल्ल्याचा तपास मुंबई पोलीस करत होते, परंतु आता तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने यापूर्वी बिश्नोई टोळीशी संबंधित प्रकरणांचा तपास केला आहे. त्यामुळे, या प्रकरणाचा अधिक गांभीर्याने तपास व्हावा यासाठी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here