Home ब्रेकिंग न्यूज Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

0
Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तमिळ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ममूटी (Mammootty) हे ‘OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विविध चित्रपटसृष्टींतील लोकप्रिय कलाकारांचा सहभाग असलेल्या या प्रोजेक्टकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

OM: Chapter 1 मध्ये कोणते कलाकार दिसणार?

‘OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार पेरियासामी करत आहेत. या चित्रपटात धनुष आणि ममूटी यांच्यासोबत साई पल्लवी, श्रीलीला, नसीरुद्दीन शाह आणि इंद्रन्स यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रादेशिक चित्रपटसृष्टींतील कलाकार एकत्र येत असल्याने, प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://www.prahaar.in/2026/10/16/yo-yo-honey-singh-summoned-before-maharashtra-cyber-cell-today-in-case-about-objectionable-remarks-plea-seeking-later-date-rejected/

या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या निर्मितीमध्ये RTake Studiosच्या संस्थापक आणि निर्मात्या श्रद्धा अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका आहे. विविध चित्रपटसृष्टींतील नामवंत कलाकारांना एकत्र आणून मोठ्या स्तरावर चित्रपट सादर करण्याचा निर्मितीसंस्थेचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. धनुष आणि ममूटी यांसारख्या लोकप्रिय कलाकारांना एकाच प्रोजेक्टमध्ये आणणे हा RTake Studiosसाठी विशेष क्षण असल्याचे श्रद्धा अग्रवाल यांनी नमूद केले.

प्रादेशिक सीमा ओलांडून कथा आणि कलाकारांच्या माध्यमातून प्रेक्षकांना जोडणारा सिनेमा तयार करणे, हा या उपक्रमामागील दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. ‘OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood’ या चित्रपटाला साई अभ्यंकर संगीत देत आहेत. दमदार कलाकारांची फळी, मोठ्या स्तरावरील निर्मिती आणि वेगळ्या कथानकाची अपेक्षा यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

OM: Chapter 1 कधी होणार रिलीज ?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘OM: Chapter 1: Udhiram – The Blood Wood’ हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. धनुष आणि ममूटी यांना एकाच पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here