Home फोटो गॅलरी IPL 2027 स्पर्धेत रोहित शर्माकडे पुन्हा येणार कर्णधारपदाची धुरा? असं कसं होऊ शकते? ते समजून घ्या

IPL 2027 स्पर्धेत रोहित शर्माकडे पुन्हा येणार कर्णधारपदाची धुरा? असं कसं होऊ शकते? ते समजून घ्या

0
IPL 2027 स्पर्धेत रोहित शर्माकडे पुन्हा येणार कर्णधारपदाची धुरा? असं कसं होऊ शकते? ते समजून घ्या
आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी रोहित शर्माकडे कर्णधारपदाची सोपण्याचा विचार करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल पदकं जिंकली आहेत. (Photo: ANI)
आपीएल 2024 स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड केलं होतं. तसेच रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून त्याच्याकडे सोपवलं होतं. तेव्हापासून तीन पर्वात रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धा खेळला. पण या तिन्ही वर्षात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. (Photo: ANI)
रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर चाहत्यांनी प्रचंड विरोध केला. इतकंच काय तर हार्दिक पांड्याला भर मैदानात डिवचण्याची संधी सोडली नाही. इतकंच काय तर ड्रेसिंग रूममध्येही तणावाचं वातावरण असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुंबई इंडियन्स व्यवस्थापन कर्णधार बदलण्याच्या तयारी आहे.(Photo: ANI)
रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स व्यवस्थापन रोहित शर्मावर पुन्हा एकदा विश्वास टाकण्याच्या तयारीत आहे. इतकंच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचं नावंही आहे. पण यात रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. (Photo: ANI)
मुंबई इंडियन्स कर्णधार बदलणार या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याबाबत सस्पेन्स आहे. हार्दिक पांड्याने फ्रेंचायझी सोडण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे. आता फ्रेंचायझीसाठी ट्रेडसाठी इतर फ्रेंचायझींसोबत संपर्क साधत आहे. असं असताना रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा दावा आणखी मजबूत होताना दिसत आहे. (Photo: ANI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here