सणासुदीच्या हंगामाचे औचित्य साधत टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘टीव्हीएस रॅडियन’ (TVS Radeon) मोटरसायकलची अगदी नवीन आवृत्ती नुकतीच बाजारात सादर केली आहे. आतापर्यंत 11 लाखांहून अधिक ग्राहकांनी या दुचाकीवर आपला विश्वास दाखवला असून, कंपनीने या नव्या मॉडेलमध्ये आधुनिक डिझाइन आणि आकर्षक लूकची जोड दिली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/07/airtel-hikes-postpaid-plans-by-rs-50-adds-free-annual-international-roaming/
आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक एलईडी लाइटिंग
नव्या टीव्हीएस रॅडियनच्या बाह्यरूपात मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये फ्युएल टँक, साइड पॅनल आणि रिअर काउलची रचना अधिक देखणी करण्यात आली असून, नवीन डायनॅमिक ग्राफिक्समुळे या मोटरसायकलला अधिक तरुण आणि गतिमान रूप मिळाले आहे. दुचाकीच्या पुढील बाजूस सिग्नेचर लाइटिंगसह अगदी नवीन फुल एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे. त्याला साजेसे एलईडी टर्न सिग्नल लॅम्प्स आणि मागील बाजूस 3D टनेल इफेक्ट असलेला आकर्षक एलईडी टेल लॅम्प यामुळे या बाईकचा अंदाज पूर्णपणे बदलला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/05/oppo-f35-series-launched-in-india-powerful-features-including-an-8000mah-battery/
आरामदायी प्रवास आणि आधुनिक फीचर्स
डिझाइनमधील बदलांसोबतच प्रवाशांच्या आरामाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या मोटरसायकलमध्ये तिच्या श्रेणीतील सर्वात लांब सीट (Long Seat) देण्यात आली आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासात चालकाला आणि सहप्रवाशाला अधिक आराम मिळतो. तसेच, RTMi सुविधेसह (Real-Time Mileage Indicator) रिव्हर्स एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जोडण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान आवश्यक ती सर्व माहिती चालकाला सहज उपलब्ध होईल.
https://www.prahaar.in/2026/10/04/whatsapp-business-rates-have-changed-find-out-if-this-will-impact-your-pocket/
कंपनीची भूमिका आणि उपलब्धता
या नवीन लॉन्चिंगबाबत बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध हलदार यांनी स्पष्ट केले की, “ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैली आणि अपेक्षेनुसार ही नवीन रॅडियन विकसित करण्यात आली आहे. बाईकची उत्कृष्ट बांधणी, विश्वासार्हता आणि दैनंदिन वापरातील उपयुक्तता कायम राखत तिला अधिक मॉडर्न लूक देण्यात आला आहे.”
नवीन टीव्हीएस रॅडियन कंपनीच्या अधिकृत डीलरशिप्सवर तीन वेगवेगळ्या प्रकारांत (Variants) उपलब्ध करून देण्यात आली असून, तिची प्रारंभिक किंमत 67,100 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.