Home ब्रेकिंग न्यूज Ramayan: भारतीय संस्कृतीचा जगभरात डंका, “रामायण ” दिसणार आता 40 भाषांमध्ये

Ramayan: भारतीय संस्कृतीचा जगभरात डंका, “रामायण ” दिसणार आता 40 भाषांमध्ये

0
Ramayan: भारतीय संस्कृतीचा जगभरात डंका, “रामायण ” दिसणार आता 40 भाषांमध्ये
ramayan part 1

मुंबई : रामायण चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण चित्रपट हा 40 भाषांमध्ये प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय पौराणिक कथांचा जगभरात प्रसार करण्याच्या हेतूने हा महत्वाचा प्रयत्न मानला जात आहे.(RAMAYAN)

https://www.prahaar.in/2026/10/12/from-the-end-to-the-beginning-sunny-deols-action-film-announced-lucne-vedhalan-lakshya-in-surya/

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट भव्य स्वरूपात तयार करण्यात असून या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, पौराणिक कथा आणि प्रभू श्रीराम यांची कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ ने दिलेल्या वृत्तानुसार, रामायण चित्रपट जवळपास 40 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाषांतर आणि डबिंग केल्यामुळे विविध देशांतील प्रेक्षकांना त्यांच्या माहिती असलेल्या भाषेत हा चित्रपट पाहता येऊ शकतो.चाहते रणबीर कपूरच्या ‘रामायण’ ची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी जवळचा चित्रपट गृहात प्रकाशित होणार आहे. चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग 20 ऑक्टोबर पासून म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार आहे. निर्माते आणि चाहते चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत दिसून येत आहेत. चित्रपट जास्तीतजास्त प्रेक्षकांना पर्यंत पोहचावा आणि समजण्यास योग्य जावा यासाठी हा चित्रपट 40 भाषांमध्ये करण्याचा प्रयत्न चालू आहे.(SAI PALLAVI, RANBIR KAPOOR)

https://www.prahaar.in/2026/10/12/the-trailer-and-songs-of-lagna-ani-barach-kahi-a-film-featuring-modern-perspectives-the-delightful-nuances-of-relationships-and-a-beautiful-blend-of-emotions-have-b/

फिल्म ची उत्तम अशी स्टारकास्ट

नमित मल्होत्रा ​​या चित्रपटाचे निर्माते असून, नितेश तिवारी दिग्दर्शक आहेत. रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ते प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. साई पल्लवी या चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत प्रेकशकांचा भेटीला येणार असून, रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याचे खूप कौतुक होत आहे. यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारत असून, त्यांचा रावणाचा लूकचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय, रकुल प्रीत सिंह, अरुण गोविल, लारा दत्ता हे कलाकार सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह यांचा लुक मुळे त्याना ट्रोल सुद्धा करण्यात आले.

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मलयाळम सह आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच “रामायण पार्ट 2 ” हा पुढचा दिवाळीला म्हणजेच दिवाळी 2027 मध्ये प्रकाशित होणार आहे. आता प्रेक्षक वर्ग चित्रपट पाहण्यास आणि बॉक्स ऑफिस वर हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravie Dubey (@ravidubey2312)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here