Home ब्रेकिंग न्यूज Madhuri Dixit: लोकांच्या टोमण्यांमुळे माधुरी दीक्षितही कधीकाळी खचलेली, आईने शिकवलेल्या संघर्षाच्या धड्यामुळे बदललं आयुष्य!

Madhuri Dixit: लोकांच्या टोमण्यांमुळे माधुरी दीक्षितही कधीकाळी खचलेली, आईने शिकवलेल्या संघर्षाच्या धड्यामुळे बदललं आयुष्य!

0
Madhuri Dixit: लोकांच्या टोमण्यांमुळे माधुरी दीक्षितही कधीकाळी खचलेली, आईने शिकवलेल्या संघर्षाच्या धड्यामुळे बदललं आयुष्य!
फोटो सौजन्य: Youtube

मुंबई: बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांना नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. कायमच अभिनय आणि डान्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या माधुरीने होस्टिंगची जबाबदारी घेतली आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या आठव्या सीझनची होस्टिंगची जबाबदारी माधुरी दीक्षितकडे असणार आहे. येत्या 12 ऑक्टोबरपासून ‘कोण होणार करोडपती’चा आठवा सीझन टेलिकास्ट होणार आहे. त्यापूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘कौन बनेगा करोडपती 18’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि तिला आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले.

https://www.prahaar.in/2026/10/10/pv-sindhu-donates-her-game-worn-jerseys-to-deepika-padukone-for-world-mental-health-day-initiative-available-on-sale-at-850/

‘कौन बनेगा करोडपती 18’ बोलताना माधुरीसाठी तिच्या आईचे डान्स आणि कलासंबंधित गोष्टींमध्ये मोठे योगदान आहे. अभिनेत्रीने आपल्या आईच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना अमिताभ बच्चन यांच्या दिवंगत आई, तेजी बच्चन यांच्याशीही केली. शोदरम्यान, अमिताभ बच्चन यांनी माधुरीला तिच्या आईसोबतच्या नात्याबद्दल आणि आईकडून शिकलेल्या गोष्टींबद्दल विचारले. “माधुरीजी, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही ज्या व्यक्तीला ‘आई’ म्हणता, त्यांच्याकडून तुम्ही खूप काही शिकलात किंवा असं काही मिळवलं जे आजही तुमच्यासोबत आहे?” असा प्रश्न बिग बींनी माधुरीला विचारला. उत्तर देताना माधुरीने सांगितले की, “माझी आई माझी ताकद होती. मी तिच्याकडून कला, डान्स आणि आर्ट्स संबंधित अनेक गोष्टी तिच्याकडून शिकले. माझी आई तुमच्या आई इतकीच कणखर होती. जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीत आले, तेव्हा मी खूप लहान होते. त्या वयात, कोणतीही नकारात्मक टिप्पणी मला त्रासदायक वाटायची.”

“कोणाच्यातरी शब्दांनी दुःखी होऊन मी अनेकदा घरी परतायचे. अशा वेळी माझी आई मला सल्ला द्यायची, की इतकी कमजोर होऊ नकोस आणि कोणाचेही ऐकू नकोस. तुला जे करायचे आहे, ते कर. फक्त काम करत राहा आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे… जे लोक नकारात्मक बोलतात, ते आपल्याला एखादे यश मिळाल्यानंतर सकारात्मक होतात.” असं सुद्धा अभिनेत्री म्हणाली. यावेळी, शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी माधुरीला तिच्या काही सदाबहार गाण्यावर थिरकण्याची विनंती केली. बिग बींच्या विनंतीला मान देऊन अभिनेत्रीने डान्स देखील केला. बिग बी म्हणाले, “कॉम्प्युटरजी, कृपया माधुरीसाठी एक गाणे लावा.” ‘काहे छेद छेद मोहे’ हे प्रसिद्ध गाणे वाजू लागताच, हॉटसीटवर बसलेल्या माधुरीने डान्सवर ठेका धरायला सुरूवात केली.

https://www.prahaar.in/2026/10/09/drishyam-3-movie-bollywood-actor-ajay-devgn-become-first-to-give-3-hits-after-covid-19-drishyam-2-and-shaitaan/

माधुरीच्या डान्सने आणि चेहऱ्यावरील हावभावांनी डेलीसोपच्या ह्या कार्यक्रमाला चार चाँद लावले. तिच्या शास्त्रीय नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. अमिताभ बच्चन यांनी माधुरीच्या डान्सची प्रशंसा करत तिच्यासाठी खास टाळ्या सुद्धा वाजवल्या. माधुरीने परफॉरमन्स केल्यानंतर बिग बी म्हणाले, “व्वा! अविश्वसनीय माधुरी.” अमिताभ यांच्या स्तुतीने माधुरीसुद्धा हसताना दिसली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here