Home फोटो गॅलरी Kanya Poojan Gift Ideas: कन्या पूजनाच्या वेळी कुमारिकांना द्या ‘या’ खास भेटवस्तू

Kanya Poojan Gift Ideas: कन्या पूजनाच्या वेळी कुमारिकांना द्या ‘या’ खास भेटवस्तू

0
Kanya Poojan Gift Ideas: कन्या पूजनाच्या वेळी कुमारिकांना द्या ‘या’ खास भेटवस्तू

हिंदू धर्मात  नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत कुमारिकांची पूजा केली जाते. यावेळी मुलींना गोड पदार्थ, फळे, चणे दिले जातात. तसेच त्या परत जात असताना त्यांनी भेटवस्तू देण्याचीही परंपरा चालत आली आहे. आधी स्त्रिया कन्यापूजनाच्या वेळी मुलींना पैसे द्यायच्या पण आता गिफ्ट्स देण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. यानिमित्ताने कन्या पूजनाला मुलींना काय गिफ्ट देऊ शकतो हे पाहूया.

स्टेशनरी सेट कन्यापूजन साठी देणं हा एक चांगला आणि उपयोगी प्रकार आहे. या एका सेट मध्ये पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, कंपास आणि रंगपेटी मिळते. गुलाबी हा बहुतांश मुलींचा आवडता रंग असल्याने गुलाबी रंगाचा युनिकोर्नचा हा स्टेशनरी सेट त्यांना नक्की आवडेल. याची किंमत देखील १०० ते १५० च्या घरात आहे. त्यामुळे हा एक उत्तम पर्याय ठरेल.
हे अशे छोटे क्युट केसाचे क्लिप्स आणि रबरदेखील कन्यापूजनासाठी चांगला पर्याय आहे. हे क्लिप्स सुंदर आणि आकर्षक दिसतात. आपल्या वेगवेगळ्या कपड्यांवर वेगवेगळ्या रंगाचे क्लिप्स आणि रबर स्टाईल करता येऊ शकतात. वेगवेगळ्या रंगाचे आणि डिजाईनचे हेअर मुलींना खूप आवडतात आणि त्या कोणत्याही कपड्यांवर सहजपणे शोभून दिसतात.
तिसरा पर्याय आहे ब्रेसलेट. मोत्याचे किंवा मण्यांचे पेस्टल रंगांचे ब्रेसलेट हे मुलींना शोभून दिसतात. हे ब्रेसलेट १०० रुपयांच्या आत मिळतात. त्यामुळे हा अगदी स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. हे ब्रेसलेट ऑनलाईन किंवा स्थानिक दुकानांतून खरेदी करता येतात.
जर तुम्हाला काही उपयुक्त वस्तू द्यायची असेल तर जेवणसाठीचे छोटे डब्बे देऊ शकता. मुलांच्या आवडत्या कार्टूनचे किंवा रंगांचे डबे साधारण बाजारात १०० रुपयांच्या आतादेखील मिळतात.
तुम्ही मुलींना ‘क्ले कलर्स’ देखील देऊ शकता. मुलांना क्ले कलर्स खूप आवडतात आणि त्यासोबत खेळण्यात ती दिवसभर मग्न राहतात.हे क्ले कलर्स अवघ्या ५० रुपयांना देखील मिळतात.
तुम्ही लहान मुलींना पर्सही भेट देऊ शकता. आजकाल मुलींसाठी ५० ते १०० रुपये किमतीच्या आकर्षक पर्स उपलब्ध असतात. या छोट्या पर्स खूप आकर्षक वाटतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here