हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत कुमारिकांची पूजा केली जाते. यावेळी मुलींना गोड पदार्थ, फळे, चणे दिले जातात. तसेच त्या परत जात असताना त्यांनी भेटवस्तू देण्याचीही परंपरा चालत आली आहे. आधी स्त्रिया कन्यापूजनाच्या वेळी मुलींना पैसे द्यायच्या पण आता गिफ्ट्स देण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. यानिमित्ताने कन्या पूजनाला मुलींना काय गिफ्ट देऊ शकतो हे पाहूया.





