Home नवरात्रौत्सव Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

0
Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!
Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना! (Photo: AI)

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सवर साजरा केला जातो. 11 ऑक्टोबर 2026 पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीत देवींच्या नऊ शक्तीची उपासना केली जाते. त्यामुळे प्रतिपदेला घरोघरी देवघराजवळ देवीचे घट बसवले जातात. त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. देवीच्या उपासनेमुळे सुख, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचा वास घरात होतो, अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळे या नऊ दिवसांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. घट स्थापन करताना कलशाचं विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात कलश सुख आण समृद्धीचं प्रतिक मानलं गेलं आहे. पण या कळश स्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यात काही विशेष आणि पवित्र गोष्टी टाकल्या जातात. चला जाणून घेऊयात सविस्तर

कलशाच्या आत काय टाकावं?

कलश स्थापन करताना त्यात साधं शुद्ध जल भरावं.त्यात थोडं गंगाजल मिसळावं. तसेच आपला हात त्या कळशावर ठेवून ‘गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति। नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु॥’ या मंत्राचा जप करावा. सात पवित्र नद्यांचा त्यात वास आहे, अशी भावना मनात ठेवावी. त्यानंतर त्यात अक्षता टाकाव्यात. त्यानंतर देवीला प्रिय असलेलं फुल अर्पित करावं. समृद्धीचं प्रतीक म्हणून त्यात एक नाणं टाकावं. शेवटी हळकुंड किंवा चिमुटभर हळद टाकावी. या सर्व गोष्टी कळशात टाकाल्यानंतर त्याचं पावित्र्य अनेक पटीने वाढतं. पूजेवेळी या कळशाची पूजा केल्याने त्याचा प्रभाव वाढतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

https://www.prahaar.in/2026/10/08/is-it-inauspicious-to-wear-gold-jewelry-during-the-period-of-shani-sade-sati-what-does-astrology-say/

कलशावर श्रीफळ ठेवा

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात श्रीफळ वाढून केली जाते. त्यामुळे श्रीफळाचं महत्त्व अधिक आहे. नारळाला श्रीफळ संबोधलं जातं. त्याचा थेट संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. नारळ हा बाहेरून टणक आणि आतून मऊ असतो. त्या पद्धतीनेच आपल्यातील अहंकार जावा आणि नम्र भाव यावा अशी भावना असते. नारळाचा पांढरा अंतर्भाग आपल्या सत्यतेचे प्रतीक मानलं जातं. तसेच श्रीफळावरीस तीन डोळे हे ब्रह्मा, विष्णु आणि महेश प्रतीक आहे. त्यामुळे श्रीफळाचं महत्त्व पूजेत अधोरेखित होतं.

कलशातील शुद्ध जल नकारात्मक उर्जा दूर करते. तसेच आतील अक्षता, पुष्प, नाणं आणि हळकुंड यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. तर कलशावरील श्रीफळ देत देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभते. तर श्रीफळावरी तीन डोळ्यांमुळे ब्रह्मा, विष्णु आणि महेशाचा आशीर्वाद लाभतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here