Home देश Uttar Pradesh Viral Video : शाळकरी विद्यार्थ्याच्या डोक्यावर शिक्षकाने वाजवला ‘तबला’; व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर निलंबनाची कारवाई!

Uttar Pradesh Viral Video : शाळकरी विद्यार्थ्याच्या डोक्यावर शिक्षकाने वाजवला ‘तबला’; व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर निलंबनाची कारवाई!

0
Uttar Pradesh Viral Video : शाळकरी विद्यार्थ्याच्या डोक्यावर शिक्षकाने वाजवला ‘तबला’; व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर निलंबनाची कारवाई!

इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या अजब आणि अशोभनीय वर्तनाचा प्रकार समोर आला आहे. वर्गात बसलेल्या एका लहान विद्यार्थ्याच्या टक्कल असलेल्या डोक्यावर शिक्षकाने चक्क ‘तबला’ वाजवल्याचा प्रकार घडला. इतकेच नाही तर या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने कठोर पावले उचलत संबंधित शिक्षकाला सेवेतून निलंबित केले आहे.

शिक्षकाने स्वतःच काढला व्हिडिओ आणि फेसबुकवर केला शेअर

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://www.prahaar.in/2026/10/09/minister-nitesh-rane-inspects-a-shrimp-processing-plant-in-andhra-pradesh/

निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव दिनेश कुमार माथूर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माथूर यांनी वर्गात शिकवत असताना स्वतःच्या मोबाईलवरून हा संपूर्ण प्रकार चित्रित केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक खुर्चीवर बसलेले दिसत असून, समोर जमिनीवर एक लहान मुलगा बसलेला आहे. दिनेश माथूर हे त्या मुलाच्या टक्कल असलेल्या डोक्यावर एखाद्या वाद्याप्रमाणे दोन्ही हातांनी थाप मारत ‘तबला’ वाजवल्याचा आव आणत हसत आहेत. पुढे जाऊन त्यांनी हा व्हिडिओ स्वतःच्या वैयक्तिक फेसबुक अकाउंटवर अपलोड केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालकांसह सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षण विभागाची मोठी कारवाई; शिक्षक तात्काळ निलंबित

https://www.prahaar.in/2026/10/09/a-decision-bringing-relief-for-mpsc-students-soon/

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या (Basic Education Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेतली. इटावाचे मुख्य प्राथमिक शिक्षण अधिकारी (BSA) डॉ. राजेश कुमार यांनी शिक्षकाचे हे कृत्य अत्यंत गैरवर्तणुकीचे आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे असल्याचे सांगत दिनेश कुमार माथूर यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी केले.

विभागीय चौकशीचे आदेश

शिक्षकाच्या या कृत्याची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक विशेष समिती स्थापन केली आहे. या चौकशीचा संपूर्ण अहवाल आल्यानंतर शिक्षकावर पुढील कठोर कायदेशीर आणि विभागीय कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा हे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण असणारे ठिकाण मानले जाते; मात्र शिक्षकानेच अशा प्रकारे विद्यार्थ्याची टवाळी केल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील शिस्तीवर आणि शिक्षकांच्या जबाबदारीवर सर्वस्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here