Home ब्रेकिंग न्यूज कसारा रेल्वे ब्लॉकमुळे 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले; पहा सविस्तर माहिती

कसारा रेल्वे ब्लॉकमुळे 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले; पहा सविस्तर माहिती

0
कसारा रेल्वे ब्लॉकमुळे 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले; पहा सविस्तर माहिती
फाईल फोटो

मध्य रेल्वेवरील पायाभूत सुविधांचा विकास आणि रेल्वे प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. आसनगाव ते कसारा दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या जोडणीसाठी आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाईनच्या इगतपुरी बाजूकडील विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2026 दरम्यान 12  दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत कसारा स्थानक आणि परिसरात अत्यंत तांत्रिक स्वरूपाची ‘प्री-नॉन-इंटरलॉकिंग’, ‘नॉन-इंटरलॉकिंग’ आणि ‘पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंग’ची कामे युद्धपातळीवर केली जाणार आहेत. हे काम कसारा आणि कल्याण दरम्यानच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचाच एक मुख्य भाग आहे. विशेष ब्लॉक अंतर्गत आगामी 10 ते 13 ऑक्टोबर 2023 या चार दिवसांच्या कालावधीत अद्ययावत माहिती देण्यात आली आहे.  दिनांक 9/10/2026 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर कुशीनगर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे 4.30 वाजता सुटेल.

दिनांक 10/10/2026 ते दिनांक 13/10/2026या कालावधीतील रेल्वे सेवेवरील परिणामांचा तपशील

ब्लॉकच्या तारखा: दिनांक 10/10/2026 (शनिवार) ते दिनांक 13/10/2026 (मंगळवार)

ब्लॉकचा कालावधी:

  • दिनांक 10/10/2026 (शनिवार) रोजी 15.35 ते 21.35 वाजेपर्यंत,
  • दिनांक 11/10/2026 (रविवार) रोजी 11.30 ते 18.30 वाजेपर्यंत,
  • दिनांक 12/10/2026 (सोमवार) आणि दिनांक 13/10/2026 (मंगळवार) रोजी 15.35 ते 20.35 वाजेपर्यंत.

ब्लॉकचा विभाग:

कसारा – खर्डी आणि उंबरमाळी – कसारा दरम्यानची ‘अप’ मेन लाईन; यामध्ये प्लॅटफॉर्म क्र.1, 3, 4 आणि ‘अप’ यार्डचा समावेश आहे.

(अ) गाडीच्या परीचालनावर होणारे परिणाम – उपनगरीय सेवा

ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज

दिनांक 10/10/2026 , दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026 रोजी उपनगरीय रेल्वे सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन/ ओरीजनेशन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 10.10, 14.17, 14.46 आणि 16.50 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरीय रेल्वे सेवा आसनगाव स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

कसारा येथून 15.35, 16.16, 17.02 आणि 18.17 वाजता सुटणाऱ्या कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय रेल्वे सेवा अनुक्रमे 16.12, 16.54, 17.39 आणि 18.54 वाजता आसनगाव स्थानकावरून सुरू होईल.

दिनांक 10/10/2026 रोजी कसारा येथून 20.15 वाजता सुटणारी कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय रेल्वे सेवा 20 मिनिटे उशिरा सुटेल.

दिनांक 11/10/2026 रोजी उपनगरीय रेल्वे सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन/ ओरीजनेशन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 13.10, 14.17 आणि 14.46 वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कसारा उपनगरीय रेल्वे सेवा आसनगाव स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

कसारा येथून 15.35, 16.16 आणि 17.02 वाजता सुटणाऱ्या कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय रेल्वे सेवा अनुक्रमे 16.12, 16.54 आणि 17.39 वाजता आसनगाव स्थानकावरून सुरू होईल.

दिनांक 11/10/2026 रोजी कसारा येथून 18.17 वाजता सुटणारी कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय रेल्वे 13 मिनिटे उशिरा सुटेल.

दिनांक 10/10/2026 ते दिनांक 13/10/2026 या कालावधीतील शेवटच्या आणि पहिल्या उपनगरीय रेल्वे सेवा

‘डाऊन नॉर्थ ईस्ट’ मार्गावर कसारा येथे जाण्यासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरीय रेल्वे सेवा दिनांक 10/10/2026 ते दिनांक 13/10/2026 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.30 वाजता सुटेल.

‘अप नॉर्थ ईस्ट’ मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येण्यासाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची उपनगरीय रेल्वे सेवा दिनांक 10/10/2026 ते दिनांक 13/10/2026 दरम्यान कसारा येथून 14.42 वाजता सुटेल.

‘डाऊन नॉर्थ ईस्ट’ मार्गावर कसारा येथे जाण्यासाठी ब्लॉकनंतरची पहिली उपनगरीय रेल्वे सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून खालीलप्रमाणे सुटेल:

दिनांक 10/10/2026 , दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026 रोजी 18.28 वाजता; आणि दिनांक 11/10/2026 (रविवार) रोजी 16.50 वाजता.

‘अप नॉर्थ ईस्ट’ मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येण्यासाठी ब्लॉकनंतरची पहिली उपनगरीय रेल्वे सेवा कसारा येथून खालीलप्रमाणे सुटेल:

दिनांक 10/10/2026 रोजी 20.35 वाजता, दिनांक 11/10/2026 रोजी 18.30 वाजता आणि दिनांक 12/10/2026 व दिनांक 13/10/2026 रोजी 20.15 वाजता.

रेल्वे वाहतुकीवर होणारा परिणाम – मेल आणि एक्सप्रेस गाड्या

भुसावळ विभागातील इगतपुरी येथे किंवा इगतपुरीच्या आधी, दिनांक 10/10/2026 , दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026 रोजी खालील गाड्यांचे नियमन केले जाईल आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी 35 ते 40 मिनिटे उशिरा पोहोचतील:

  • गाडी क्रमांक 12166 गोरखपुर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026
  • गाडी क्रमांक 12172 हरिद्वार – लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026
  • गाडी क्रमांक 12870 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026
  • गाडी क्रमांक 11082 गोरखपुर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026
  • गाडी क्रमांक 11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026
  • गाडी क्रमांक 22512 कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी एक्सप्रेस – दिनांक 12/10/2026
  • गाडी क्रमांक 12108 सीतापुर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस – दिनांक 12/10/2026
  • गाडी क्रमांक 22130 अयोध्या कँट – लोकमान्य टिळक टर्मिनस तुलसी एक्सप्रेस – दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 22224 साईनगर शिर्डी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026 आणि दिनांक 12/10/2026
  • गाडी क्रमांक 12860 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 12533 गोमती नगर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुष्पक एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 17618 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 11072 बलिया – लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026

भुसावळ विभागातील इगतपुरी येथे किंवा इगतपुरीच्या आधी दिनांक 11/10/2026 (रविवार) रोजी खालील ‘अप’ गाड्यांचे नियमन केले जाईल आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी 35 ते 40 मिनिटे उशिरा पोहोचतील:

  • गाडी क्रमांक 11012 धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12142 पाटलिपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 20705 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12294 प्रयागराज – लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11080 गोरखपुर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11060 छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12162 आग्रा कँट – लोकमान्य टिळक टर्मिनस लश्कर एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 14314 बरेली – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12072 हिंगोली डेक्कन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 15018 गोरखपुर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12742 पटना – वास्को-द-गामा एक्सप्रेस

खालील ‘डाऊन’ गाड्या दिनांक 10/10/2026 , दिनांक 12/10/2026 ६ आणि दिनांक 13/10/2026 रोजी 20 ते 25 मिनिटे उशिरा चालवण्यात येतील:

  • गाडी क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस – राजगीर एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 12139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 15066 पनवेल – गोरखपुर एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 12107 लोकमान्य टिळक टर्मिनस – सीतापुर एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026 आणि दिनांक 12/10/2026
  • गाडी क्रमांक 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 20435 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज वंदे भारत एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026
  • गाडी क्रमांक 12546 लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल कर्मभूमी एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026
  • गाडी क्रमांक 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड पंचवटी एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नांदेड-राज्यराणी एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 12105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस – दिनांक 10/10/2026, दिनांक 12/10/2026 आणि दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 12137 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – फिरोजपुर पंजाब मेल – दिनांक 10/10/2026 आणि दिनांक 12/10/2026
  • गाडी क्रमांक 12293 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस – दिनांक 12/10/2026
  • गाडी क्रमांक 15268 लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल अंत्योदय एक्सप्रेस – दिनांक 12/10/2026
  • गाडी क्रमांक 12173 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रतापगड उद्योगनगरी एक्सप्रेस – दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 12261 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा दुरांतो एक्सप्रेस – दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 02197 कोईम्बतूर – जबलपुर सुपरफास्ट विशेष – दिनांक 13/10/2026
  • गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस – नांदेड एक्सप्रेस – दिनांक 13/10/2026

दिनांक ११.१०.२०२६ (रविवार) रोजी खालील ‘डाऊन’ गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावतील:

  • गाडी क्रमांक 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12617 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन मंगलाद्वीप एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपुर गरीब रथ एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस – बलिया कामायनी एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11047 दादर – गोरखपुर एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस – राजगीर एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12143 लोकमान्य टिळक टर्मिनस – सुलतानपुर एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 05586 लोकमान्य टिळक टर्मिनस – सहरसा स्पेशल
  • गाडी क्रमांक 12173 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रतापगड उद्योगनगरी एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12261 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा दुरंतो एक्सप्रेस

दिनांक 13/10/2026 नंतरच्या ‘ब्लॉक’चा तपशील योग्य वेळी कळविला जाईल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here