Home ब्रेकिंग न्यूज यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; पाहा Photos…

यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; पाहा Photos…

0
यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; पाहा Photos…
यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील (फोटो सौजन्य: यामी गौतम X Account)

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड कपल यामी गौतम आणि आदित्य धर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आर्टिकल 370 चित्रपटासाठी या कपलला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. सध्या आदित्य आणि यामी मुंबई सोडून त्यांच्या मुळ गावी हिमाचल प्रदेशला स्थायिक होण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. झगमगाटापासून दूर राहून त्यांना निवांत आयुष्य जगायचं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य- यामी त्यांच्या हिमाचल प्रदेशातील 100 वर्षे जुन्या घरात शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. आता स्वत: आदित्या धरच्या पीआर टीमने माध्यमांना अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/06/shreya-ghoshal-mumbai-concert-2027-ticket-prices-revealed-heres-how-much-the-most-expensive-pass-for-the-unstoppable-india-tour-costs/

हिमाचल प्रदेशला शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांवर आदित्यच्या जनसंपर्क टीमने नकार दिला आहे. आदित्य धरच्या टीमने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “नाही, यामी- आदित्य मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला जाणार नाहीत. तुम्हाला या अशा बातम्या कोण पाठवत आहेत?” असं म्हणत त्यांनी सर्व चर्चांना धुडकवून लावले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आदित्य- यामीच्या घराची चर्चा सुरू आहे. ते नेमकं घर कसं आहे? या बॉलिवूड कपलच्या घराची नेमकी खासियत काय आहे? याची माहिती जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मंडीतल्या गोहरमध्ये यामीने तिच्या लग्नाआधी 25 एकरामध्ये 100 वर्षे जुनं हेरिटेज घर खरेदी केलं होतं. लाकूड आणि दगडापासून बनवलेल्या ह्या बंगल्याभोवती सफरचंद, बटाटा, आलूबूखारा आणि आल्लं या पिकांची शेती सुद्धा आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

यामी- आदित्यने जून 2021 मध्ये हिमाचलमधील याच बंगल्यामध्ये लग्नगाठ बांधलं होतं. या घरासोबत अभिनेत्रीच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या अनेक आठवणी आणि भावनिक संबंध जोडलेले आहेत. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, यामी गौतमच्या हेरिटेज घराची किंमत तब्बल 8 कोटी इतकी आहे. ई- टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने या घराची खरेदी 2016 साली केलेली होती. या घराच्या माध्यमातून अभिनेत्री आपल्या वडिलोत्पार्जित संपत्तीचे जतन करतेय. अभिनेत्रीने आपल्या ह्या घरातील अनेक फोटोज् सोशल मीडियावर देखील शेअर केलेले आहेत. यामीसाठी आपल्या गावी घर खरेदी करणे म्हणजे, गुंतवणुकी पेक्षा गावासोबत कनेक्ट राहणं हा तिचा मुख्य उदेश होता. बालपणापासूनच यामीचं तिच्या गावासोबत नातं आहे. प्रत्येक सुट्टीला ती गावी एन्जॉय करण्यासाठी जायची.

https://www.prahaar.in/2026/10/06/oscar-2027-nominated-gondhal-marathi-movie-special-screening-in-indias-main-6-cities/

दरम्यान, यामीने आजही तिच्या घरातील जुनेपण जपले आहे. या घराला आलिशान बंगल्यामध्ये बदलण्याऐवजी त्यांनी घराचा साधेपणा कायम ठेवला आहे. याआधीही शुटिंग संपल्यानंतर, फावल्या वेळी यामी आणि आदित्य गावच्या घरी राहण्यासाठी जायची. पण, आता यामी आणि आदित्य यांनी कायमस्वरूपी हिमाचलमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here