हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने देदिप्यमान यश मिळवलं आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपद मिळवलं. इतकंच काय तर कसोटी, वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये भारताने दमदार कामगिरी केली. मात्र आता हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ संपला आहे. कारण तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमधून कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे तिची जागा कोण घेणार? हा प्रश्न आहे. असं असताना क्रीडाप्रेमींच्या डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते स्मृती मंधानाचं.. त्याचं कारणही तसंच आहे. कारण भारतीय महिला संघात स्मृती मंधानाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. तिने अनेक सामन्यात भारताला यश मिळवून दिलं आहे. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा होणं सहाजिकच आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरनंतर स्मृती मंधाना हेच नाव पहिल्यांदा चर्चेत असणार आहे.
स्मृती मंधानाचं नाव आधीही चर्चेत…
हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर स्मृती मंधानाच्या नावाची चर्चा सुरू झाली असं अजिबात नाही. यापूर्वीही स्मृती मंधानाच्या नावाची चर्चा झाली आहे. स्मृती मंधाना भारतीय महिला संघाची धुरा सांभाळेल, असं आधीपासून बोललं जात होतं. 37 वर्षीय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ विजयी पथावर जात होता. पण तिचा फॉर्म हा चिंतेचा विषय होता. त्यामुळेच तिच्या कर्णधारपदावर टांगती तलवार होती. असं असताना गुवाहाटीतील बीसीसीआय बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं. ही बैठकच मुळात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वावर निर्णय घेण्यासाठी होती, असं बोललं जात आहे. त्यामुळेच या बैठकीत प्रशिक्षक अमोल मुझूमदार, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/10/06/shubman-gill-opened-up-when-asked-question-about-the-t20-series-against-the-west-indies/
भारतीय महिला संघाच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या बैठकीत उपकर्णधार असण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी अंदाज बांधण्यास सुरूवात केली होती. स्मृती मंधाना त्या बैठकीत असल्याने भारतीय महिला संघाचं पुढचं नेतृत्व तिच्याच खांद्यावर असेल, असं बोललं जात आहे. आता स्मृती मंधाना हे नेतृत्व स्वीकारणार का? की वेगळं नाव समोर येणार? याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.