Home ब्रेकिंग न्यूज BJP News: भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर, 29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

BJP News: भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर, 29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

0
BJP News: भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर, 29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
फोटो सौजन्य: रविंद्र चव्हाण ट्वीटर

मुंबई: युवा संघटन अधिक बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी 29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली. विशेष म्हणजे या सर्व पदाधिकाऱ्यांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. नांदेडच्या २८ वर्षीय शंभवी साळे यांच्याकडे युवती प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नव्या कार्यकारिणीत 10 उपाध्यक्ष, चार महामंत्री, 10 सचिव, कोषाध्यक्ष, सहकोषाध्यक्ष, कार्यालय प्रमुख, सामाजिक माध्यम प्रमुख आणि युवती प्रमुख अशा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पक्षाची ध्येयधोरणे आणि विविध उपक्रम तरुणांपर्यंत पोहोचविण्यासह युवा संघटन अधिक बळकट करण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर असेल.

https://www.prahaar.in/2026/10/05/minister-nitesh-ranes-tour-of-vidarbha-against-the-backdrop-of-drought-like-conditions/

उपाध्यक्षपदी रत्नागिरीचे विक्रम जैन, पुण्याचे मयुर दौंडकर, कल्याणचे भावार्थ दौंड, बुलढाण्याचे शुभम जायभाय, छत्रपती संभाजीनगरचे मयुर वंझारी, लातूरचे सौरभ चौहान, वाशिमचे वैभव वायचाळ, वर्ध्याचे अंकुश ठाकुर, सिंधुदुर्गातील देवगडचे श्रेयस शाहकर आणि पुण्याचे सौरभ पुंडलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महामंत्रीपदी नागपूरचे बादल राऊत, सोलापूरचे सुदर्शन यादव, पिंपरी-चिंचवडच्या तेजस्विनी दुर्गे आणि बीडचे दत्तप्रसाद जाधव यांना संधी देण्यात आली आहे. सचिवपदी साताऱ्याचे अनीमेश कुलकर्णी, रत्नागिरीचे अव्दैत कुलकर्णी, नागपूर शहराचे अमेय विश्वरुप, जळगावचे राज चव्हाण, जालन्याचे राहुल नरोटे, इगतपुरीचे योगेश चांदवडकर, कोल्हापूरचे जयेश बुगड, मुंबईचे अतुल जैन, रत्नागिरीचे ॲड. मिलिंद नांदगावकर आणि यवतमाळचे ॲड. बाळकृष्ण कायपेलवार यांची नियुक्ती झाली आहे.

कोषाध्यक्षपदाची जबाबदारी मुंबईचे विरेंद्र ठाकुर यांच्याकडे, तर सहकोषाध्यक्षपद यश सातपुते यांना देण्यात आले आहे. मुंबईचे यश तायडे कार्यालय प्रमुख, नवी मुंबईचे प्रदिप सकपाळ सामाजिक माध्यम प्रमुख, तर नांदेडच्या शंभवी साळे युवती प्रमुख म्हणून काम पाहतील.

https://www.prahaar.in/2026/10/05/maharashtra-government-significant-decision-regarding-students-nutritious-meals-measures-taken-to-ensure-timely-provision-of-fresh-wholesome-food/

युवती संघटन विस्तारण्याची जबाबदारी

शंभवी साळे यांच्यावर राज्यातील युवतींचे संघटन मजबूत करण्याची तसेच तरुणींच्या प्रश्नांना युवा मोर्चाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असेल. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यातील विविध विभागांतील तरुणांना पक्षाच्या संघटनात्मक कामाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपने यापूर्वीही प्रदेश संघटनेत विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. फेब्रुवारी २०२६मध्ये कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here