मुंबई: दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या बाणगंगा तलावात दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे. तलावामध्ये दुषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या माशांचा खच पडला होता. घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आले होते. यावेळी, महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे आणि स्थानिक नगरसेवक सन्नी सानप यांची उपस्थिती होती. शिवाय, पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर तलावाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिले जाणार असल्याची माहिती लोढा यांनी माध्यमांना दिली.
https://www.prahaar.in/2026/10/05/mumbai-development-tour-amit-satam-influencers-coastal-road-atal-setu/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वॉर्डमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाणगंगा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली होती. पितृपक्षाच्या काळात बाणगंगा तलाव येथे पिंडदानासह विविध धार्मिक विधी करण्यासाठी हजारो नागरिक येतात. या विधींमध्ये वापरण्यात येणारे काही पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडले जात असल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून, जलजीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तलाव परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
https://www.prahaar.in/2026/10/05/mumbai-metro-mission-2027-devendra-fadnavis-infrastructure-projects-updates/
गेल्या गुरुवारी महापालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बाणगंगा तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पितृपक्षाच्या काळात वाढणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता, धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे साहित्य तलावात किंवा परिसरात टाकले जाऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि जलजीवनाचे संरक्षण यासाठी योग्य त्या उपाययोजना महापालिकेने त्वरित कराव्यात. १० कृत्रिम तलाव तयार केले जातील. तसेच दूषित पाण्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पंपांची संख्या वाढवली जाणार आहे.
येत्या शनिवारी पितृपक्षाचा कालावधी संपणार असून, या काळात बाणगंगा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे पितृपक्षाच्या उर्वरित कालावधीत तसेच त्यानंतरही तलाव परिसरात स्वच्छता कायम राहावी, यासाठी महापालिकेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.
https://www.prahaar.in/2026/10/05/flydubai-flight-incident-eknath-shinde-lauds-indian-pilot-smit-machchhar-calls-his-bravery-a-rare-feat-in-world/
पिंडदान विधीदरम्यान वापरण्यात येणारे काही पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडले जातात. हे पदार्थ जलजीवांनी सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाणगंगा तलावात धार्मिक परंपरा जपत पर्यावरणपूरक पद्धतीने पिंडदानाचे विधी करावेत. बाणगंगा तलावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. पितृपक्षाच्या काळात येथे मोठ्या संख्येने नागरिक धार्मिक विधींसाठी येतात. आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि धार्मिक परंपरा जपत असतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. तलावातील जलजीवनाचे संरक्षण व्हावे, यासाठी नागरिकांनी पाण्यात तेल, तूप, गोड पदार्थ किंवा अन्य साहित्य टाकणे टाळावे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पिंडदान विधी करावेत. बाणगंगेचे पावित्र्य, स्वच्छता आणि पर्यावरण जपण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नागरिकांना केले आहे.