Home क्राईम Ahilyanagar Crime : दारूच्या व्यसनावरून वाद टोकाला ! आई-वडिलांच्या मारहाणीत 25 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahilyanagar Crime : दारूच्या व्यसनावरून वाद टोकाला ! आई-वडिलांच्या मारहाणीत 25 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
Ahilyanagar Crime : दारूच्या व्यसनावरून वाद टोकाला ! आई-वडिलांच्या मारहाणीत 25 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahilyanagar Crime : मुलांनी शिकून मोठं व्हावं, चांगल्या मार्गावर जावं यासाठी आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात. मात्र, मुलाला व्यसनाची लागण झाल्यानंतर घरातील परिस्थिती किती टोकाला जाऊ शकते, याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात समोर आला आहे. दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादातून आई-वडिलांनी आपल्या २५ वर्षीय मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मृत तरुणाचे नाव प्रवीण प्रकाश लांडगे (वय २५) असे आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील गुणवडी शिवारात समोर आली आहे.

दारूच्या व्यसनावरून घरात वारंवार वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीणला दारूचे व्यसन होते आणि तो आई-वडिलांसोबतच राहत होता. दारूच्या कारणावरून त्याचे आई-वडिलांसोबत वारंवार वाद होत होते. मागील आठवड्यात प्रवीण दारू पिऊन घरी आला होता. त्याला दारू प्यायलेले पाहून वडिलांचा संताप झाला. त्यानंतर आई-वडिलांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत प्रवीण गंभीर जखमी झाला.

https://www.prahaar.in/2026/10/05/nashik-crime-allegations-of-sexual-exploitation-coupled-with-pressure-to-convert-first-case-registered-in-nashik-under-the-new-law/

उपचाराऐवजी घरातच ठेवले अन्…

मारहाणीनंतर प्रवीण गंभीर जखमी झाला होता. मात्र, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दोन दिवस उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही हा प्रकार पोलिसांना किंवा इतर कोणालाही न सांगता रविवारी पहाटेच्या सुमारास मृतदेह घरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वतःच्या शेतात नेण्यात आला. तेथे मृतदेह जाळल्याचा आरोप आहे.

जळालेले अवशेष आणि हाडे पोलिसांच्या हाती

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी पंचनामा केला असता शेतात जळालेले अवशेष आणि हाडे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांची कसून चौकशी केली. चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. आई-वडिलांनी मुलाच्या हत्येची कबुली दिल्याचे एपीआय गणेश वारुळे यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here