Home क्रीडा Asian Games 2026: पावसानं घातला खोडा, पण ‘या’ नियमामुळे टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक!

Asian Games 2026: पावसानं घातला खोडा, पण ‘या’ नियमामुळे टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक!

0
Asian Games 2026: पावसानं घातला खोडा, पण ‘या’ नियमामुळे टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक!

Asian Games 2026: भारतीय क्रिकेट संघ आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचली आहे. रविवारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, मैदानाची स्थिती खेळासाठी योग्य नसल्याने सामना होऊ शकला नाही. ( India vs Afghanistan)

सामना रद्द झाल्यानंतर भारताच्या उच्च मानांकनाचा फायदा भारतीय संघाला झाला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नियमांनुसार बाद फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांपैकी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला पुढील फेरीत प्रवेश दिला जातो. सध्या भारत टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तान 10व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले.

https://www.prahaar.in/2026/09/27/indias-resounding-victory-by-300-runs-in-the-first-odi-against-the-west-indies/

भारताला मिळाली मैदानावर न उतरता पुढील फेरीत जाण्याची संधी

उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सामना खेळवता न आल्यास क्रमवारीच्या आधारे पुढील फेरीतील संघ निश्चित करण्याचा नियम लागू करण्यात आला. पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द झाल्याने भारताला मैदानावर न उतरता पुढील फेरीत जाण्याची संधी मिळाली.

दरम्यान,भारत आणि पाकिस्तानने आपापल्या उपांत्य फेरीतील सामन्यांत विजय मिळवल्यास अंतिम सामन्यातही दोन्ही संघांमध्ये सामना होऊ शकतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here