Home देश Indian Railway : भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा! पहिली ‘LNG ट्रेन’ सेवेत दाखल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Railway : भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा! पहिली ‘LNG ट्रेन’ सेवेत दाखल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

0
Indian Railway : भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक टप्पा! पहिली ‘LNG ट्रेन’ सेवेत दाखल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने पर्यावरणपूरक रेल्वेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील पहिली LNG (Liquiefied Natural Gas) म्हणजेच द्रवीकृत नैसर्गिक वायूवर चालणारी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी गुजरातमधील साबरमती येथून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या हरित प्रवासात आणखी एका नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/28/shut-up-or-ill-throw-you-out-too-an-eyewitness-makes-a-major-revelation-to-the-police-about-that-moment-in-the-ketan-agarwal-case/

2000 किमी पेक्षा जास्त अंतरावर चाचण्या घेण्यात आल्या

या ट्रेनच्या प्रत्यक्ष सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तिच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. सुमारे 2,000 किलोमीटरची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ट्रेन सुरू करण्यात आली. LNG ट्रेन सुरू करण्यामागे रेल्वेचा इंधनावरील खर्च कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन घटवणे हा प्रमुख उद्देश आहे.

ही ट्रेन एलएनजी आणि डिझेल या दोन्ही इंधनांवर चालते

ही ट्रेन पूर्णपणे LNG वर चालणारी नसून डिझेल आणि LNG अशा दुहेरी इंधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे गरजेनुसार एकाच इंजिनमध्ये दोन्ही प्रकारचे इंधन वापरता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, LNG ट्रेनच्या आधी भारतीय रेल्वेने हायड्रोजनवर चालणारी ट्रेनही सुरू केली आहे. ही 10 डब्यांची ट्रेन सध्या हरियाणातील जिंद आणि सोनीपतदरम्यान धावत आहे. या मार्गाचे अंतर सुमारे 89 ते 90 किलोमीटर आहे.

पर्यावरण स्वच्छ करण्यास मदत करेल

हे नवीन तंत्रज्ञान केवळ डिझेलचा वापर कमी करणार नाही, तर पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासही मदत करेल. हे तंत्रज्ञान कार्बन डायऑक्साइड (CO₂), नायट्रोजन ऑक्साईड (NOx) आणि सूक्ष्म कण (PM) यांसारखे प्रदूषक कमी करण्यास मदत करेल. रेल्वेकडून पर्यायी इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचा वापर वाढवण्यासाठी आणखी काही मार्गांचा अभ्यास केला जात आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेच्या इंधन वापरात आणि प्रदूषणात बदल होण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद रेल्वे विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या ट्रेनशी संबंधित व्हिडिओ आणि माहिती शेअर केली आहे. साबरमती येथून रेल्वेच्या हरित प्रवासाला सुरुवात झाल्याचे विभागाने म्हटले आहे. ट्रेनच्या उद्घाटनावेळी विद्यार्थी तिरंगा फडकवताना दिसत असल्याचा व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here